मारुती छाया क्रिकेट संघातर्फे आयोजन, टीशर्टचे झाले अनावरण
गुहागर : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने उद्या दि. २४ एप्रिल रोजी भाटी येथील मैदानावर सात संघांची एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा (MPL Cricket Tournament) रंगणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंसाठी राज विखारे यांनी टी शर्ट उपलब्ध करुन दिले. त्याचे अनावर शनिवारी (ता. 23) रात्री मारुती छाया क्रिक्रेट संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.


मारुती छाया क्रिकेट संघाने गेली अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आपले नाव राखले आहे. सलग १८ वेळा विजेतेपद तर अनेक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. आज संघात खेळणारे तरुण खेळाडू सुद्धा विविध स्पर्धेत चमकताना दिसत आहेत.
MPL Cricket Tournament
खालचापाट व जांगळेवाडी परिसरातील सर्व तरुण आणि जे काही खेळाडू खेळापासून दूर गेले आहेत, अशा सर्वांना एकत्रित करून भव्य एमपीएल क्रिकेट स्पर्धा खेलवली जाणार आहे. आयपएलच्या धर्तीवर संघातील खेळाडूंनी निवड करण्यात येऊन सात संघ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये गणराज वॉरियर्स, जी. डी. वॉरियर्स, अविनाश फायटर, ओम साई स्पोर्ट क्लब, पपू स्पोर्ट, संजय स्पोर्ट, एस लायन्स आदी संघ खेळणार आहेत.


या स्पर्धेसाठी राज रवींद्र विखारे यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी टी शर्ट उपलब्ध करून देण्यात आले. त्याचे अनावरण आज शनिवारी किरण कला मंडळाच्या सभाग्रहात करण्यात आले. यावेळी मारुती छाया क्रिकेट संघातर्फे राज विखारे यांचा मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे व सल्लागार गणेश धनावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमरदीप जाधव, रोहन विखारे, चंद्रशेखर लोखंडे, विजय धनावडे, शैलेश उदेक, धनंजय लोखंडे, सिद्धार्थ वराडकर, निलेश लोखंडे, शुभम शेटे, पुष्कर शिंदे, शुभम चव्हाण आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते. MPL Cricket Tournament

