सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजेंचे उपोषण मागे
गुहागर, दि. 03 : मराठा समाजाबाबत केलेल्या सर्व मागण्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने 28 फेब्रुवारीला दिले. त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपले उपोषण मागे घेतले. मराठा समाजाच्या मागण्या प्राधान्याने आणि कालमर्यादेत पूर्ण व्हाव्यात व त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जावी यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे मागिल तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. सरकारने कालमर्यादेत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण आनंदाने मागे घेत असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले. MP Sambhaji Raje’s Fast


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या बैठकीत संभाजीराजेंनी केलेल्या सर्व मागण्यांसह मराठा समाजाच्या इतरही मागण्या पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. MP Sambhaji Raje’s Fast
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खा. राहूल शेवाळे आणि संभाजीराजेंचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व फायदे कसे देता येतील आणि प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी तातडीने कशी करता येईल. यावर भर देत मार्ग काढण्याची सूचना केली. संभाजीराजे यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ईएसबीसी आणि एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे. त्याच पदावर कायमस्वरूपी नियूक्ती देण्याची मागणी करण्यात आली होती. MP Sambhaji Raje’s Fast


सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही आरक्षण नाकारल्याने या पदांवरच्या जवळपास साडेसहाशे नियुक्या रखडल्या होत्या. या उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून या तरूणांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर संध्याकाळी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खा. राहूल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांनी आझाद मैदानामध्ये येऊन संभाजीराजेंची भेट घेतली. मागण्यांवर कशाप्रकारे आणि किती दिवसामध्ये निर्णयाची अमलबजावणी होईल याचा आराखडा एकनाथ शिंदेनी संभाजीराजेसमोर सादर केला. राज्यसरकारने दिलेल्या लेखी आश्वासनाने समाधान झाल्याने बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे संभाजीराजेनी यावेळी जाहीर केले. MP Sambhaji Raje’s Fast
राज्य सरकारने घेतलेले निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे वाचून दाखविले. त्यानंतर संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे यांना एकनाथ शिंदेनी व्यासपीठावर बोलावून त्यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हातून संभाजीराजेंना संत्र्याचा रस पाजून हे उपोषण सोडल्याचे असल्याचे जाहीर केले. MP Sambhaji Raje’s Fast
सरकारकडे मागण्या
- सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येणार.
- सारथीमधील रिक्त पदे 15 मार्च 2022 पर्यत भरण्याचा निर्णय.
- सारथी संस्थेचे व्हीजन डाँक्युमेंट तज् सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत तयार करणार.
- मराठा आंदोलनावरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा दरमहा गृह विभागाकडून आढावा.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर दोन महामंडळांवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकांची 15 मार्च 2022 पर्यंल नियुक्ती करणार.
- सारथी संस्थेच्या राज्यभरातील आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत मंत्री मंडळास सादर करून मान्यता घेणार
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मंजूर रू. 100 कोटीपैकी रू. 80 कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित रू.20 कोटी उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरवणी मागणी व्दारे अतिरिक्त 100 कोटी रूपये निधी देणार.
- व्याज परताव्यासंदर्भात कागदपत्रांची पुर्तता करून प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीना व्याज परतावा देणार.
- परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत धोरण तयार करण्यात येत आहे
- व्याज परताव्यासाठी कर्जाची मुद्दत रू. 10 लाखांवरून रू. 15 लाख करणार.
- जिल्हामध्ये स्थापन करावयाच्या वसतिगृहांची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून घेऊन तयार असलेल्या वसतिगृहांचे येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन करणार.
- कोपर्डी खून खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलांची सुनावणी तातडीने घेण्यासाठी महाधिवक्त्यांना विनंती करून 2 मार्च 2022 रोजी प्रकरण मेंन्शन करण्यात येईल.
- रिव्ह्यू पिटिशन ची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वाच्च न्यायालयात पंधरा दिवसात अर्ज करणार. अशोक चव्हाण, दिलिप वळसे पाटील आणि एकनाथ शिंदेकडे याची जबाबदारी.

