ऑफ्रोह’च्या मोर्च्याला विविध संघटनांचा जाहिर पाठिंबा
गुहागर, दि. 07 : ३३ अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या समाज व कर्मचारी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. सोमवार, दि. ७ मार्च २०२२ ला आझाद मैदान, मुंबई येथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन (Organization for Human Rights)(ऑफ्रोह(Afroh)) संघटनेचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. Morcha Of Afroh


अनुसूचित जमातीवरील अन्याय कोणताही असो, त्यासाठी संघर्ष करणा-यांचे मनोधैर्य वाढवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. याला आम्ही प्राथमिकता देत आहोत. अधिसंख्य पदाबाबतचे चुकीचे आदेश व संपूर्ण आयुष्य शासनाच्या सेवेत व्यतीत करणा-या कर्मचा-यांना सेवासवलती व सेवानिवृत्ती नंतरचे सर्व फायदे रोखून ठेवणे हा सरासर अन्याय आहे. या अन्यायाविरूद्ध ‘ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन’ या संघटनेने पुकारलेल्या 7 मार्चच्या विधानसभेवरील मोर्च्याला आम्ही बिनशर्थ जाहीर पाठिंबा देत आहोत, अशी भूमिका स्वराज्य गृप व आदर्श अनुसूचित जाती-जमाती बहुउद्देशीय संस्था जळगावचे संस्थापकीय अध्यक्ष ॲड. गणेश सोनवणे यांनी घेतली आहे. Morcha Of Afroh
‘ऑफ्रोह’ च्या धडक मोर्च्यास आदर्श अनुसूचित जाती-जमाती बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध संघटनांनी पाठिबा जाहीर केला आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी व कार्यकर्त्यांनी या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. Morcha Of Afroh
आदिवासी हलबा समाज सेवामंडळ कल्याण, हलबा समाज सेवा मंडळ वसई,आदिवासी राज समाज संघ अमरावती, अखिल भारतीय आदिवासी मन्नेवार समाज, आदिम संविधान संरक्षण समिती, हलबा सेना नागपूर, हलबा क्रांती सेना, अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, आदिवासी वाल्मिकलव्य सेना, स्वराज संघटना, धनगर समाज अधिकारी-कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, आदर्श अनुसूचित जाती-जमाती बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य, आदिवासी हलबा, हलबी समाज व कर्मचारी उत्कर्ष समिती या सर्वच संघटनांच्या अध्यक्ष-सचिवांनी ‘ऑफ्रोह’चे अध्यक्ष शिवानंद सहारकर यांना लेखी पत्राने कळविले आहे. Morcha Of Afroh
ऑफ्रोहने जाहिर केलेल्या 7 मार्चच्या मोर्च्यात किती कर्मचारी उपस्थित राहणार. याबाबत ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्यासह ‘ऑफ्रोह’च्या विविध जिल्ह्यातील पदाधिका-यांना पोलीस विभागाकडून विचारणा करण्यात येत आहे. Morcha Of Afroh

