संतोष वरंडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा
गुहागर, ता. 19 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या वतीने मॉक इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 158 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एसबीआय क्लार्क, एलआयसी इन्शुरन्स एजंट आणि डी मार्ट चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या तीन पदासाठी घेण्यात आली होती. Mock Interview Competition at Patpanhale College
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील विमा क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री संतोष वरंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नेहमी विश्वासाच्या जोरावर मेहनत घेण्याचे तयारी ठेवल्यास सहज कोणत्याही आव्हानांना सामोरे जाता येते हे स्पष्ट केले. तसेच माहिती आणि ज्ञान आजच्या युगात कसे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी आहेत त्या संधी शोधा म्हणजे मुंबईला न जाता याच ठिकाणी चांगले उत्पन्न आपण मिळवू शकतो असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दुसऱ्याला सहकार्य करण्याची वृत्ती असल्यास आणि परस्पर समन्वय असेल तर नक्कीच कोणत्याही गोष्टींमध्ये सहज आपण यशस्वी होऊ शकतो या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. Mock Interview Competition at Patpanhale College

एसबीआय क्लार्क या पदासाठी प्रतीक पालकर, अम्मार नेवरेकर, प्रणया गावडे आणि निखिल टानकर यांनी तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव डी मार्ट या पदासाठी प्रणव गोडबोले, साहिल आग्रे, नुपूर कारेकर आणि स्वीटी पाटेकर यांनी तर एलआयसी इन्शुरन्स एजंट या पदासाठी ऋतुजा भेकरे, समृद्धी घाणेकर, अमृता आंबेकर आणि जानवी विचारे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यास तीन हजार रुपये, द्वितीय क्रमांकास दोन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास एक हजार रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यास 700 रुपयाचे पारितोषिक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. Mock Interview Competition at Patpanhale College
या कार्यक्रमांमध्ये दोन वर्षांपूर्वी मॉक इंटरव्यू स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या आणि आता खाजगी कंपन्यामध्ये चांगल्या पदावर असणाऱ्या मंदार देर्दैकर आणि मृणालिनी देर्दैकर यांचा विशेष सत्कार हा महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. Mock Interview Competition at Patpanhale College

या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी लायन्स क्लब गुहागरचे अध्यक्ष अमित मुसळे, उद्योजक माधव ओक, शामकांत खातू, प्रवीण पटेल आणि विवेक जोशी, एचडीएफसी शृंगारतळीचे शाखा व्यवस्थापक श्री राजेंद्र चव्हाण तसेच पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री सुधाकर चव्हाण उपस्थित होते. या सर्व बक्षीस विजेत्यांना ट्रॉफी राहुल डेव्हलपर्स चे मालक श्री राहुल शेटे यांनी दिल्या. तसेच प्रा. डॉ. एस एस खोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धेसाठी 18 हजार रुपये पारितोषिक दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा भेकरे, प्रस्तावना जानवी विचारे आणि समारोप दीक्षा साळवी हिने केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस एस खोत आणि प्रा. एस एस घडशी तसेच महाविद्यालयाचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Mock Interview Competition at Patpanhale College