गुहागर, ता. 19 : दाभोळ खाडीत बुडणारी एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनात आली. तातडीने पोलिसांचे एक पथक यांत्रिक नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. बुडणाऱ्या व्यक्तीकडे लांब दोरी बांधलेली रबर ट्युब (Lift Buoy Rescue Tube) फेकण्यात आली, ती ट्युब बुडणाऱ्या व्यक्तीने पकडल्यावर दोरी खेचून त्याला नौकेवर आणण्यात आले. ही घटना 16 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास दाभोळ खाडीत घडली. हे थरार नाट्य पोलिसांच्या माॅक ड्रिलचा भाग असल्याचे नंतर उघड झाले. Mock Drill in Dabhol Creek


नैसर्गिक किंवा अपघाती आपत्तीमध्ये खाडीत बुडणाऱ्या लोकांना वाचविता आले पाहीजे. यासाठी दाभोळ सागरी पोलीस ठाणे व गुहागर पोलीस ठाणे यांनी संयुक्त अभ्यास मोहीम दिनांक 16/05/2022 रोजी राबविली. Mock Drill in Dabhol Creek


या मोहिमेमध्ये दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पी. ए. हिरेमठ व पाच पोलीस अंमलदार, गुहागर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बी.के.जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कदम, रहाटे, घोसाळकर, चौगले, मोनये असे पाच पोलीस अंमलदार तसेच सागर कन्या बोटीवर कार्यरत असणारे आर.डी लाड पोलिस उपनिरिक्षक नौका विभाग, पावसकर पोलिस उपनिरिक्षक नौका विभाग व नौका विभागाचे 2 कर्मचारी सहभागी झाले होते. Mock Drill in Dabhol Creek


Photo

