• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे नगरपंचायत लढवणार

by Guhagar News
November 12, 2025
in Old News
121 2
0
MNS will contest the Nagar Panchayat
238
SHARES
681
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11: गुहागर शहरातील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या मदतीने नगरपंचायत निवडणुकीत 2 ते 3 जागांवर आपला उमेदवार उभा करणार आहेत. या वृत्ताला अधिकृतपणे मनसे पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र प्रभाग क्र. 4, 5, 6, 11, 12, 13, 14, 15 या प्रभागांपैकी कोणत्या प्रभागातून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे याची चाचपणी मनसेचे कार्यकर्ते करत आहे. MNS will contest the Nagar Panchayat

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यानंतर निवडणुकांमध्ये युती होईल अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र अधिकृतपणे आजपर्यंत अशी घोषणा झालेली नाही. परंतू काहीच दिवसांपूर्वी शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शृंगारतळीतील मनसेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मनसेला महाविकास आघाडीत सामील करुन घेतले. संपूर्ण महाराष्ट्र ज्या राजकीय समीकरणांची वाट पहात आहेत त्या मनसे शिवसेना युतीचे पहिले उदाहरण आमदार जाधव यांनी सर्वांसमोर आणले आहे. गुहागर नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून मनसे निवडणूक लढविणार आहे. त्यांना गुहागर शहरातील 2 ते 3 जागा देण्याचे आमदार भास्कर जाधव यांनी कबुल केले. MNS will contest the Nagar Panchayat

प्रभाग क्र. 4, 5, 6, 11, 12, 13, 14, 15 या प्रभागांपैकी कोणत्या प्रभागातून आपण लढु शकतो याची चाचपणी सध्या मनसे कार्यकर्ते करत आहेत. या नव्या राजकय खेळीमुळे मनसेला नगरपंचायतीमध्ये आपले नगरसवेक जिंकून आणण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही संधी मनसे साधणार का या कडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. MNS will contest the Nagar Panchayat

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNS will contest the Nagar PanchayatNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.