• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्कर जाधव यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार

by Ganesh Dhanawade
September 1, 2022
in Guhagar
22 0
0
MLA Jadhav was felicitated
43
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह

गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती सेनेचे गुहागर तालुक प्रमुख सचिन बाईत यांनी दिली आहे. हा भव्य सत्कार ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शृंगारतळी येथे पालपेणे रोडवरील भवानी सभागृहात संपन्न होणार आहे. MLA Jadhav was felicitated

यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम व उपजिल्हा प्रमुख रविंद्र सुर्वे उपस्थित राहाणार आहेत. तसेच गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व माजी जि. प. व पं.स. पदाधिकारी सेनेचे गुहागर तालुक्यातील सर्व जेष्ठ कार्यकर्ते यांनी उपस्थित राहाण्याची विनंती गुहागर तालुका प्रमुख यांनी केली आहे. शृंगारतळी येथे बऱ्याच कालावधी नंतर सेनेचा हा जाहिर कार्यक्रम होत असल्याने याला अलोट गर्दी लोटणार असे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेत बऱ्याच आमदारांनी पक्ष सोडून बंड केले. व त्यामुळे सेनेला सत्ता गमवावी लागली. महाडचे भरत गोगावले, दापोलीचे आम. योगेश कदम व रत्नागिरीचे आम. उदय सामंत यांनी पक्ष सोडल्यामुळे जिल्ह्याची संघटनात्मक मोठी जबाबदारी आता भास्कर जाधव यांच्यावर आली आहे. MLA Jadhav was felicitated

शिवसेनेतले नुकतेच झालेले बंड त्यानंतर सत्तांतर व नुकतेच झालेले पावसाळी अधिवेशन या विषयी आम भास्कर जाधव काय भूमिका मांडतात याविषयी सर्वांनाच उतसुकता असून त्या दृष्टीने शृंगारतळीत ३ सप्टेंबरला होत असलेल्या या मेळव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. MLA Jadhav was felicitated

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMLA Jadhav was felicitatedNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.