• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कर्मचाऱ्यांना आरजीपीपीएलमध्ये सामावून घेणार

by Mayuresh Patnakar
April 27, 2022
in Politics
17 0
0
MLA Jadhav meeting with RGPPL Officials
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव यांचे भेटीत अधिकाऱ्यांचे आश्वासन

गुहागर, ता. 27 : आरजीपीपीएलने (RGPPL) 31 जानेवारीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. 26 स्थानिक कर्मचारी बेरोजगार झाले. या कामगारांच्या पाठीशी उभे रहात आरजीपीपीएलमध्ये पुन्हा नोकरी देण्यासाठी आमदार भास्कर जाधव प्रयत्नशील होते. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदारांनी बैठक घेतली. या बैठकीत आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे आश्र्वासन दिले आहे. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

आरजीपीपीएलची (RGPPL) मालकी एनटीपीसीकडे गेल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांना लक्ष्य केले जात होते. स्थानिक कामगारांच्या वाहनांना कंपनीत प्रवेश द्यायचा नाही. कंपनीअंतर्गत असलेल्या पंपातून डिझेल, पेट्रोल द्यायचे नाही. कंपनीद्वारे मिळणाऱ्या सुविधा द्यायच्या नाहीत. कंपनीअंतर्गत होणाऱ्या मनोरंजनात्मक, कौटुंबिक कार्यक्रमात सामावून घ्यायचे नाही. असे कामगार विरोधी निर्णय घेण्यात आले. याच धोरणाचा भाग म्हणून वीज उत्पादन कमी असल्याचे सांगत आरजीपीपीएल व्यवस्थापनाने  31  जानेवारीला  26 स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. हेच धोरण पुढेही कंपनीने अवलंबिले. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

MLA Jadhav meeting with RGPPL Officials

पहिल्या टप्प्यात बेरोजगार झालेल्या 26 कर्मचाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायांचा पाढा वाचला. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. कंपनीचे प्रश्र्न सोडविण्यासाठी मदत करेन मात्र स्थानिकांना प्राधान्य दिलेच पाहिजे. अशी आग्रही भुमिका मांडली. त्यांनी विधीमंडळातही आरजीपीपीएलचा प्रश्र्न लावून धरला. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

दरम्यानच्या काळात फैसल कासकर यांना युनिव्हर्सल टेक्निकल सर्व्हिसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी ही स्वयंरोजगार संस्था निर्माण करण्यास सांगितले. आरजीपीपीएलमध्ये (RGPPL) गेली  15  ते  20 वर्ष अभियंता, तांत्रिक सहाय्यक, कॉम्युटर ऑपरेटर, कार्यालयीन लिपिक आदी पध्दतीने कंत्राटी कर्मचारी असणाऱ्यांना या संस्थेचे सभासद करुन घेण्यात आले. या संस्थेद्वारे आरजीपीपीएलमधील नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी द्यावी. अशी मागणी करण्यात आली. त्याचा पाठपुरावा माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव आणि फैसल कासकर करत होते. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

याच संदर्भात सोमवारी 26 एप्रिलला आमदार भास्कर जाधव यांनी आरजीपीपीएल प्रकल्पस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरी हाच मुख्य विषय होता. या बैठकीअंती आरजीपीपीएलचे (RGPPL) मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आश्र्वासन आमदार भास्कर जाधव यांना दिले आहे. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

यावेळी महाव्यवस्थापक हर्बनसिंग बावा, एच आर प्रमुख जॉन फिलिप्स, अपर महाप्रबंधक एस. डी. कुरूप, यूपीएल कंपनीचे प्रमुख चटर्जी,  युनिव्हर्सल टेक्निकल सर्व्हिसेस को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन फैसल कासकर, आदी उपस्थित होते. MLA Jadhav meeting with RGPPL Officials

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMLA Bhaskar JadhavMLA Jadhav meeting with RGPPL OfficialsNews in GuhagarRgpplआमदार भास्कर जाधवटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.