• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालपेणे येथे आ. भास्करशेठ जाधव यांची सरकारवर टीका

by Guhagar News
October 28, 2025
in Old News
16 0
0
MLA Bhaskar Jadhav criticizes the government
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 संदेश कदम, आबलोली
 गुहागर, ता. 28 : देशामध्ये 74 वी घटनादुरुस्ती झाली. आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये अशा प्रकारचा कायदा करण्यात आला की, कुठलीही निवडणुक पाच वर्षापेक्षा जास्त पुढे ढकलता येत नाही. फार फार तर विधानसभा किंवा लोकसभा यांची मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या पेक्षा जास्त ते सरकार अस्तित्वामध्ये  ठेवता येत नाही. तशाच पद्धतीने ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील, पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका असतील यांचा पाच वर्षाचा  कालावधी संपला. हा कालावधी संपण्यापूर्वीच निवडणुकांना घेतल्याच पाहिजेत अशा प्रकारची 74 व्या घटना दुरुस्ती तरतूद करण्यात आली. कायदा करण्यात आला. MLA Bhaskar Jadhav criticizes the government

आज देशांमध्ये जे सरकार आहे ते सरकार सगळेच काय ते नियम प्रथा परंपरा धाब्यावर बसवत आहेत. त्यांनी सगळ्यात संस्थांची ज्याला खऱ्या अर्थाने स्वास्थ्य संस्था म्हणतात त्या संस्थांची पूर्णपणे तोडमोड केलेली आहे. आपल्याला वाटेल तशा पद्धतीने कायदा न मानता आपला देश म्हणजे प्रत्येक देशाची एक घटना असते त्या घटने अनुरूप राज्य सरकार कारभार चालवते परंतु विद्यमान सरकारने ती घटना पाळलीच नाही. अशी सडकून टीका गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. MLA Bhaskar Jadhav criticizes the government

गुहागरचे आम. भास्करशेठ जाधव यांनी आज गुहागर तालुक्यातील पालपेणे  येथे असगोली जि. प. गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची बैठक घेतली होती. यावेळी आम. भास्करशेठ जाधव यांनी राज्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका वरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. MLA Bhaskar Jadhav criticizes the government

 ते बोलताना पुढे म्हणाले की हे सरकार निवडणुका घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. खालचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात जाऊच नये तसेच सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व कारभार मंत्र्यांनीच चालवायचा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यांच्या या प्रयत्नांना कोर्टाच्या निर्णयाने छेद दिला आहे. मागील तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका येत्या 31 जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत घ्यायचेच आहेत. असं कोर्टाने सांगितले आहे अशी ही माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करताना दिली. MLA Bhaskar Jadhav criticizes the government

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, सिद्धीताई सुर्वे , संजय पवार यांचेसह असगोली जि. प. गटातील महिला, पुरुष, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. MLA Bhaskar Jadhav criticizes the government

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMLA Bhaskar Jadhav criticizes the governmentNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.