नासा, इस्त्रो भेटीची पार्श्र्वभुमी, शिक्षण विभागाची मेहनत
गुहागर, ता. 18 : फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना नासा (NASA), इस्रो (ISRO) या अंतराळ संशोधन संस्था पहाण्यासाठी संधी (Mission Gaganbharari) जिल्हा परिषदेने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निवड चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमासाठी व्हावी म्हणून शिक्षण विभाग मेहनत घेत आहे. पालकांनी देखील आपला पाल्य या निवड चाचणीत यशस्वी होण्यासाठी सजग रहावे. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी केले आहे.Mission Gaganbharari


Mission Gaganbharari
जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून यश मिळवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, संशोधक होण्याची क्षमता आहे. अशा विद्यार्थ्यांना शोधून, त्यांच्यातील क्षमतांचा विकास व्हावा म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नासा (NASA), इस्रो (ISRO) यासंशोधन संस्थांना भेटी देण्याचा मिशन गगनभरारी उपक्रम हाती घेतला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या उपक्रमाची आवश्यकता लक्षात घेवून जिल्हा नियोजनमधुन 70 लाख रुपयांची तरतुद केली आहे.
गुणानुक्रमावर होणार विद्यार्थ्यांची निवड
मिशन गगनभरारी उपक्रमातून नासा (NASA) या संस्थेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इयत्ता 7 वी मधील एक विद्यार्थी (एकूण 9) तर इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान 1 विद्यार्थींनी आणि 2 विद्यार्थी असे एकूण 27 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. (गुहागर तालुक्यातून जिल्हा स्तरावर 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये किमान 1 विद्यार्थीनी असणार आहे.) Mission Gaganbharari
या निवड प्रक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या संकल्पनेतून व शिक्षण अधिकारी प्राथमिक वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदीप कडव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात केंद्र, बीट, तालुका आणि जिल्ह्यास्तरावर निवड चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. Mission Gaganbharari


Mission Gaganbharari निवड चाचणी
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 वी ते 7 वी हे वर्ग असलेल्या १९७ शाळा आहेत. या शाळांमधील २६४१ विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा देता येणार आहे. Mission Gaganbharari
गुहागर तालुक्यात 20 केंद्रशाळा आहे. या केंद्रशाळा अंतर्गत बुधवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत निवड चाचणी घेतली जाईल. ही चाचणी 100 गुणांची असेल. या चाचणीमध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्र्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्र्नाला पर्याय दिलेले असतील. त्यातील योग्य त्या पर्यायाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. प्रत्येक केंद्रातून गुणानुक्रमे पहिल्या 10 विद्यार्थ्यांची (एकूण 200 विद्यार्थ्यांची) निवड केली जाईल. Mission Gaganbharari
केंद्र स्तरावर गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी निवड चाचणी बीट स्तरावर होईल. ही चाचणी परीक्षा 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेतली जाईल. या चाचणीमध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्र्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्र्नाला पर्याय दिलेले असतील. त्यातील योग्य त्या पर्यायाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. गुहागर तालुक्यात 4 बीट आहेत. या चाचणी परीक्षेत प्रत्येक बीट मधुन गुणानुक्रमे 10 विद्यार्थ्यांची (एकूण 40 विद्यार्थ्यांची) निवड तालुकास्तरावरील निवड चाचणीसाठी होईल. Mission Gaganbharari
बीट स्तरावर निवडल्या गेलेल्या 40 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर रविवार, 11 डिसेंबर 2022 रोजी निवड चाचणी घेतली जाईल. ही चाचणी परीक्षा तालुकास्तरावरील एका जिल्हा परिषद शाळेत होईल. या परीक्षेत 20 गुणांसाठी एक निबंध व 40 बहुपर्यायी प्रश्र्न (80 गुण) असे स्वरुप असेल. या चाचणी परीक्षेतून गुणानुक्रमे पहिले 10 विद्यार्थी जिल्हा स्तरावरील मुलाखत व सादरीकरण/प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी निवडले जातील.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती व सादरीकरण/प्रात्यक्षिक परीक्षा शनिवार, 17 डिसेंबर 2022 व रविवार 18 डिसेंबर 2022 या दिवशी होईल. मुलाखतीसाठी 50 गुण व सादरीकरण/प्रात्यक्षिकासाठी 50 गुण असतील. Mission Gaganbharari
Mission Gaganbharari साठी अभ्यासक्रम
1. सुर्यमाला, 2. गुरूत्वाकर्षण, 3. पृथ्वीचे अंतरंग, 4. भारताच्या अवकाश मोहीमा, 5 जलचक्र, 6. पर्यावरण व प्रदुषण, 7. विविध भूरुपे, 8. चंद्र, 9. वृत्तजाळी (अक्षवृत्त रेखावृत्त व इतर), 10. अन्नसाखळी परीसंस्था, 11. वातावरण (थर, ओझोन व इतर), 12. पाणी व पाण्याचे असंगत आचरण, 13. सूक्ष्मजीव, 14. जैवविविधता, 15. हरीतक्रांती, 16. अन्न व अन्नसुरक्षा पोषक द्रव्ये व कुपोषण, 17. ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार, 18. पदार्थ व वस्तू अपमार्जके, 19. रोगराई, महामारी, रोगप्रतिबंध व लसीकरण, 20. अनुवंशिकता, 21. मानवी इंद्रिय संस्था, अस्थिसंस्था, पचनसंस्था, श्वसन, रक्ताभिसरण, चेतासंस्था इ., 22. नैसर्गिक संसाधने (हवा, पाणी, मृदा, खनिजे, धातुके इ.), 23. सजिव व निर्जिव, 24. पेशी, 25. हवामान व तापमान, 26. महासागर व सागर संपत्ती, 27. सजीवांचे वर्गीकरण, 28. आपत्ती व आपत्तीचे व्यवस्थापन, 29. पदार्थ व पदार्थांच्या अवस्था, 30. धातू व अधातू, 31. गती, बल, त्वरणा, विस्थापन, चाल, ऊर्जा व कार्ये, 32. यंत्रे व यंत्राचे प्रकार, 33. ध्वनी, 34. प्रकाश, 35. चुंबक व चुंबकत्व, 36. उष्णता, 37. अनुकूलन, 38. मुळे व मुळांचे प्रकार, 39. द्राव्य द्रावक व द्रावण, 40. भौतिक राशी, 41. मुलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे, 42. इंधन व इंधनाचे प्रकार, 43. ग्रहण, 44. दोलक, 45. आम्ल व आम्लारी, 46. प्रकाश संश्लेषण, 47. शोध, शास्त्रज्ञ, संशोधन, 48. दुर्बिण व दुर्बिणीचे प्रकार, सुक्ष्मदर्शी इ. 49. विद्युतधारा, 50. भौतिक राशी व रासायनिक बदल
निवड चाचणीचे वेळी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी
विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्र्नपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे संपूणे नाव, इयत्ता, शाळेतील हजेरी क्रमांक, शाळेचे पूर्ण नाव, केंद्राचे नाव बिनचुक न विसरता लिहा. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रश्र्नपत्रिकेवरच उत्तरांचे पर्याय दिलेले असतील. त्यातील योग्य पर्याय निवडून त्यावर बरोबर अशी खूण करायची आहे. तेव्हा खाडाखोड करु नका. Mission Gaganbharari
निवड चाचणीचे वेळी प्रत्येकाला दिली जाणारी प्रश्र्नपत्रिका ही स्वतंत्र असणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पूर्ण तयारी आपली आपल्यालाच करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रावर गेल्यावर ज्या प्रश्र्नांची उत्तरे आपल्याला खात्रीने येत आहेत ते प्रश्र्न लगेच सोडवा. न येणारे प्रश्र्न, शांतपणे विचार करुन आपले आपण सोडवा. Mission Gaganbharari


गुहागरच्या शिक्षण विभागाची मेहनत
गुहागर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन गगनभरारी (Mission Gaganbharari) उपक्रमाचे वातावरण तयार करण्यात आज शिक्षण विभाग यशस्वी झाला आहे. इयत्ता 5 वी ते 7 वी मधील विद्यार्थ्यांकडून तीन्ही इयत्तांमधील विज्ञान विषयाचा अभ्यास विशेष तासिकेद्वारे करुन घेतला जात आहे. जिल्हा परिषदे शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जात आहे. तंत्रस्नेही शिक्षकांद्वारे अभ्यासक्रमातील विविध विषयांबाबत इंटरनेटवर असलेली माहिती, व्हिडिओ यांच्या लिंक शोधुन त्या शिक्षकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. याशिवाय गटशिक्षणाधिकारी लिना भागवत यांनी प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्र, पालक यांना मिशन गगनभरारी या उपक्रमांचे महत्त्व सांगण्यासाठी सभा घेतल्या. हा विषय ग्रामपंचायतीपर्यंत पोचावा म्हणून गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व गटशिक्षणाधिकारी लिना भागवत यांनी नुकतीच तालुक्यातील सरपंचांची सभा बोलावली. या सभेमध्ये मिशन गगनभरारी (Mission Gaganbharari) उपक्रम, निवड चाचणी या विषयी माहिती देण्यात आली.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन
तालुक्यातून मिशन गगनभरारीसाठी (Mission Gaganbharari) निवडण्यात येण्याऱ्या 3 विद्यार्थ्यांमध्ये आपला पाल्य असावा यासाठी पालकांनी सजग रहावे. पाल्याकडून विज्ञान विषयाचा अभ्यास करुन घ्यावा. शिक्षण विभाग शाळांद्वारे तयारी करुन घेत आहे. त्याची उजळणी घ्यावी. शिक्षकांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची कशी निवड होईल यासाठी प्रयत्न करावेत. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या काठिण्य पातळीच्या चाचण्या, मुलाखत, सादरीकरण या प्रक्रियेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चित उज्ज्वल असेल. त्यासाठी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना दिलेली ही सुवर्णसंधी असून याचा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला लाभ उठवून देण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन गुहागरच्या गटशिक्षणाधिकारी लिना भागवत यांनी केले आहे.