प्राथमिक चौकशीत महिलांचे उत्तर, त्या मुली नातेसंबधांतील
गुहागर, ता. 07 : या अल्पवयीन मुली नातेसंबंधामधील असून त्यांना मुंबई (Mumbai) पहाण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो. घरांच्यांनी परवानगी दिली नसती म्हणून काहीही न सांगता आम्ही मुलांसह बाहेर पडलो. अशी माहीती अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी यांनी पोलीसांना दिली आहे. याबाबत पोलीसांचा (Guhagar Police) तपास अजुनही सुरुच रहाणार आहे. तोपर्यंत या महिलांना अंजनवेल सोडून जाता येणार नाही. असे पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान ३ अल्पवयीन मुलींची वैद्यकिय तपासणी (Medical) रविवारी झाली. या मुलींना सोमवारी बालकल्याण समितीसमोर (Child Welfare Committee) हजर करण्यात येणार आहे. Missing Girls Case
शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी 4 च्या सुमारास अंजनवेल आरमारकर मोहल्ला येथील अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी या दोन महिला स्वत:च्या 4 बालकांसह 3 अल्पवयीन मुलींना (3 minor girls) घेवून बेपत्ता झाल्या होत्या. (या संदर्भातील सविस्तर बातमी – तीन अल्पवयीन मुली, 4 बालकांसह 2 महिला होत्या बेपत्ता वाचण्यासाठी लाल रंगातील वाक्यावर क्लिक करा.)
कसा घेतला शोध (Missing Girls Case)
शुक्रवारी (ता. 5) रात्री सौ. गजाला महालदार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात 9 जण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलींची माहिती पोलीसांनी घेतली होती. या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासणे, विविध ठिकाणी चौकशी करणे, आदी विविध पातळ्यांवर पोलीस तपास सुरू होता. (Search Operation) या तपासामध्ये ही मंडळी शुक्रवारी गुहागरमधुन चिपळूणला एस.टी.ने गेल्याचे उघड झाले. तेथून ही मंडळी चिपळुण रेल्वे स्थानकावर गेली. रात्रीच्या राज्यराणी किंवा कोकण कन्या या ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाली. शुक्रवारी रात्री उशिरा तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासाची दिशा स्पष्ट झाली. तत्काळ पोलीसांद्वारे मुंबई महामार्गावरील सर्व पोलीस ठाणी तसेच रेल्वे पोलीसांना याबाबतची माहिती देण्यात आली. मुंबई न जाता ही मंडळी मधल्याच स्थानकावर उतरली तर त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र शनिवारी (ता. 6) सकाळी या दोन महिला आपल्या चार मुलांसह तीन अल्पवयीन मुलींना घेवून दादर स्थानकावर उतरल्या. त्याच ठिकाणी रेल्वे पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत गुहागरमधुन पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी शनिवारी (ता. 6) दुपारी 12 च्या सुमारास दादर रेल्वे पोलीस ठाण्यात (Dadal Railway Police) जावून या सर्वांना ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांत त्यांना शोधण्यात गुहागर पोलीसांना यश मिळाले. मुंबईला गेलेले पथक शनिवारी रात्री उशिरा या सर्वांना घेवून गुहागरला पोचले. रविवारी सकाळी या महिलांची तसेच अल्पवयीन मुलींची चौकशी करण्यात आली.
मुंबईत जाण्याची हौस नडली
रविवारी सकाळी अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी यांच्यासह त्या 3 अल्पवयीन मुलींची चौकशी गुहागर पोलीसांनी सुरु केली. या चौकशीमध्ये सदर अल्पवयीन मुलींना मुंबई पहायची होती. मात्र आई वडिल परवानगी देणार नाहीत म्हणून त्यांनी आपल्या मावस बहिणींकडे मुंबईला जाण्याचा हट्ट धरला. या हट्टापायी अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी यांनी मुंबईत जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी आपल्या 4 मुलांना डॉक्टरकडे तपासण्यासाठी घेवून जातोय. सोबतीला ह्या मुली हव्यात. असे नाटक रंगवून सर्वजण घराबाहेर पडली. तिघींना घेवुन या मुंबईला गेल्या. आई वडिलांनी फोन केला तर मुंबईत जायचा प्लॅन फसेल म्हणून सोबत असलेले मोबाईल बंद केले होते. असे पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. Missing Girls Case
पोलीसांच्या तपासाला वेग
रविवारी दोन महिलांची चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे या तीन मुलींची ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे.सोमवारी या तीन मुलींना बाल कल्याण समिती, रत्नागिरी येथे नेण्यात येणार आहे. अफिया सुलतान अन्सारी आणि अरविना सुफियार पांजरी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असला तरी पोलीसांनी अटक केलेली नाही. मात्र चौकशीसाठी बोलावले जाईल त्यावेळी यावे लागेल. पोलीसांच्या पुर्वपरवानगीशिवाय अंजनवेल सोडून जाता येणार नाही. अशा कडक सूचना या महिलांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. Missing Girls Case
Missing Girls Case अंजनवेलमध्ये अफवांना ऊत
मुंबई फिरण्यासाठी जायचे हा दिखावा असून या तिन मुलींना अन्य कारणांसाठीच मुंबईला नेण्यात आले होते. या मुलींना घेवून दोन्ही महिला अन्य राज्यात जाणार होत्या. या घटनेत समोर दोन महिला दिसत असल्या तरी संपूर्ण नाट्याचा कर्ता करविता अन्य कोणीतरी आहे. डॉक्टरांकडे जातो सांगुन या दोन महिला आपल्या मुलांसह गुहागर चिपळूण, चिपळूणातून रेल्वेने मुंबई प्रवास करणे कोणाच्या पाठबळाशिवाय अशक्य आहे. इतके पैसे त्यांच्यापर्यंत कसे आले. अशा अनेक अफवा सध्या अंजनवेलमध्ये पसरल्या आहेत. Missing Girls Case