गुहागर एज्युकेशन व आरेकर प्रतिष्ठानचे आयोजन
Guhagar News : गुहागर एज्युकेशन सोसायटी आणि लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर यांच्या वतीने मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन शिबिर गुहागर रंगमंदिर येथे पार पडले. Merchant Navy Career Guidance
इयत्ता 10 वी, 12 वी नंतर नेमकं कोण कोणत्या क्षेत्रात करिअर (Career Guidance) विद्यार्थ्यांनी करावे, त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही (Merchant Navy). या क्षेत्रात करिअर करायला उत्तम संधी आहे. परंतु या क्षेत्राविषयी तेवढी जागृकता विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे या क्षेत्रात उत्तम करिअर असून सुद्धा निवडक विद्यार्थीच प्रवेश घेतात त्यामुळे मर्चंट नेव्ही विषयी जागृकता निर्माण व्हावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्ही क्षेत्राबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मर्चंट नेव्ही इंजिनिअर (Merchant Navy Engineer) श्री. इमरान कोंडकरी उपस्थित होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना करिअर नेमकं कोणत्या क्षेत्रात करता आले पाहिजे. त्या क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. यापैकी मर्चंट नेव्ही (Merchant Navy) हे एक अत्यंत महत्त्वाच क्षेत्र आहे. पण त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती नसते. त्यामुळे फार ठराविक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात. या क्षेत्राविषयी माहिती व्हावी आणि त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी निर्माण व्हावी, यासाठी गुहागर एज्युकेशन सोसायटी आणि लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान,गुहागर यांनी घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. या मार्गदर्शन शिबिरातून अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. Merchant Navy Career Guidance
यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. दीपक कनगुटकर, लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. साहिल आरेकर, गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालिका सौ. स्वाती कचरेकर, मुख्याध्यापक श्री. शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे व शिक्षक उपस्थित होते. या शिबिरात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. Merchant Navy Career Guidance