कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उद्धारकर्ते, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा व कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण या शाखेची जनरल सभा गुरुवार दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथील स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात ग्रामीणचे शाखा अध्यक्ष पांडुरंग गणपत पाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. Memorial Day of Late Rambhau Bendal

तरी माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि वार्षिक सभेला ग्रामीण तालुका शाखेचे पदाधिकारी, सल्लागार, कार्यकारिणीचे सदस्य तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट, तवसाळ गट आणि युवक मंडळ यांचे आजी – माजी सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीचे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते तसेच गुहागर तालुक्यातील समाज बंधू आणि भगिनी यांनी बहूसंख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे जाहिर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका गुहागर ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदिप गोविंद बेंडल यांनी केले आहे. Memorial Day of Late Rambhau Bendal
