मनसे कार्यकत्यांची बैठकीत मागणी
गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसंदर्भात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शृंगारतळी येथील गुहागर ता. संपर्क कार्यालय येथे पार पडली. यावेळी मनसेच्या वरिष्ठांनी प्रमोद गांधी यांना उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते म्हणून घेऊ,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. Meeting of MNS functionaries concluded
या सभेमध्ये संघटनावाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमदारकी निवडणुकीसाठी गुहागर मधून संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना उमदेवारी देण्यात यावी. प्रमोद गांधी यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाचे रान करू व त्यांना निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. गुहागर तालुक्यातील मतदार नक्कीस मनसेला मतदान करतील. अशी आशाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. Meeting of MNS functionaries concluded
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर यांनी सांगितले की, गावागावात, वाडीवस्त्यांवर मनसे पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पुढील काळात मनसेला चांगले दिवस प्राप्त होतील, असे तालुक्यात राजकीय वातावरण आहे. जनता नक्कीच मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असा विश्वास व्यक्त केला. Meeting of MNS functionaries concluded
उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी सांगितले की, गुहागर मनसेमध्ये गटतट नसून आगामी निवडणुका एकदिलाने लढविया. करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची आज गरज आहे. तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून अनेक जण निवडून आले आहेत. यावेळी बोलताना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सांगितले की, तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनसेमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे विचार गावागावात वाडीवस्त्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकीय घडामोडीला नागरिक कंटाळले असून मनसे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर असल्याचे ते म्हणाले. Meeting of MNS functionaries concluded
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष मंदार रहाटे, जितेंद्र साळवी, संदेश ठाकुर, विभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, तुषार शिरकर, सुनिल मुकनाक, सुहास चोगले, सुशांत कोळंबेकर, जानवळे ग्रा.प. सदस्य वैभवी जानवळकर, काळसुर कौंढर ग्रामपंचायत सदस्य वर्षा शितप, रजनी शितप, किरण आंबेकर, प्रसाद विखारे, विकास जोयशी, साहील खडपे, सुयोग चोगले, विकी खडपे, सुजन सुवरे, सान्वी सुवरे, नितीन पोळेकर, प्रग्नेश ठाकुर आदी उपस्थित होते. Meeting of MNS functionaries concluded