आबलोली (संदेश कदम )
गुहागर, ता.19 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली हि आपली हक्काची पतसंस्था आहे. समाज बांधवांच्या, शेतक-यांच्या, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत असून सोने तारण कर्ज, जामीन कर्ज असे अनेक प्रकारे कर्ज व्यवहार आपल्या पतसंस्थेत चालू आहेत. कुणबी पतसंस्थेने गेली अनेक वर्ष “अ” वर्ग श्रेणीचा दर्जा जोपासला आहे. यावर्षी २५ लाख रुपये नेट नफा पतसंस्थेला झाला आहे. तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी निर्माण केलेले सहकाराचे रोपटे अविरत जोपासूया असे आवाहन गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोलीचे चेअरमन रामचंद्र हुमणे यांनी केले. Meeting of Kunbi Patsanstha

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोलीच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात संचालक मंडळ व संपर्क प्रमुख यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना चेअरमन रामचंद्र हुमणे म्हणाले की, गृहतारण कर्ज देण्याचा संचालक मंडळाने मासिक बैठकीत निर्णय घेतला आहे. घर बांधणीसाठी तीन लाख रुपये गृहतारण कर्ज सहकार खात्याच्या नियमांच्या चौकटीत राहून सर्व कागदपत्र पूर्ण करणा-या पतसंस्थेच्या सभासदास १२℅ व्याजदराने देण्यात येणार आहे. हे कर्ज १० वर्षाच्या मुदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. Meeting of Kunbi Patsanstha

पतसंस्थेचे व्हा. चेअरमन तुकाराम निवाते, संचालक पांडूरंग पाते, संदिप पाष्टे, उदय गोरीवले, रविंद्र कुळ्ये यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर पतसंस्थेच्या कर्ज वसूली संदर्भात संचालक मंडळ आणि संपर्क प्रमुख यांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संपर्क प्रमूखांना पतसंस्थेतर्फे छत्र्यावाटप करण्यात आल्या. Meeting of Kunbi Patsanstha

सामाजिक कार्यकर्ते शंकर मोरे, संचालक अनंत पागडे, संदेश कदम, संदिप पाष्टे, अमोल वाघे, उदय गोरीवले, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर, संपर्क प्रमुख आबलोली मधून तुकाराम पागडे, शांताराम पागडे, खोडदे मधून प्रदिप मोहिते, गंगाराम निवाते, शंकर खापले, शिवणे मधून शंकर जोशी, पाचेरी आगर मधून बबन हुमणे , दिलीप भूवड, आंबेरेखुर्द मधून श्रीरंग डिंगणकर, भातगाव मधून गोपाळ सुवरे, यशवंत पाष्टे, कोळवली मधून मधुकर वाघे, सडेजांभारी मधून रत्नाकर सोलकर, काताळे मधून रविंद्र कुळ्ये, कोतळूक मधून सिताराम कावणकर यांचेसह पतसंस्थेचे आबलोली येथील कर्मचारी संजय खापले, संतोष हुमणे, शृंगारतळी येथील कर्मचारी सुशिल फडकले आदि उपस्थित होते. Meeting of Kunbi Patsanstha

