संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 18 : कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव “मयुरपंख – 2025” चे दि.15 ते 17 ऑक्टो. दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि व संलग्न महाविद्यालयांनी या युवा महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli
या सांस्कृतिक महोत्सव मध्ये विविध कला प्रकार संबंधी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शास्त्रिय गायन, वाद्य वादन, समुह गायन, नृत्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद, एकांकिका, वक्तृत्व, मुकनाटय, एकपात्री नाट्य, कोलाज, चित्रकला, पोस्टर्स निर्मिती, रांगोळी व संचलन ई.चा समावेश होता. या महोत्सवामध्ये सुमारे 475 विद्यार्थी व संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli

या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे मान.कुलगुरु डाॅ.संजयजी भावे यांचे हस्ते करण्यात आले. तर यावेळी मान.संचालक (शिक्षण विभाग),मान.संचालक (विस्तार शिक्षण), मान.संचालक (संशोधन विभाग), मान.संचालक (क्रीडा व सह शैक्षणिक उपक्रम), मान.सहयोगी अधिष्ठाता, मान.विद्यापीठ समन्वयक (सांस्कृतिक विभाग), मान.विद्यार्थी कल्याण अधिकारी, मान.कुलसचिव डॉ.बा.सा.सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli

शास्त्रीय गायनमध्ये कु.गणेश नाटेकर (कृषी) तृतीय क्रमांक, भारतीय सुगम गीत गायन मध्ये कु.किरण जोशी (कृषी) तृतीय क्रमांक, ताल वादन मध्ये कु.सुजल पवार (उद्यान विद्या) तृतीय क्रमांक, कु.ओंकार पाटील (कृषी) द्वितीय क्रमांक, समुह गायनामध्ये श.प. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते संघ तृतीय क्रमांक तर शरद पवार कृषि महाविद्यालय, खरवते संघ द्वितीय क्रमांक चे विजेता ठरले. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli
भारतीय लोकनृत्यामध्ये शरद पवार कृषि महाविद्यालय, खरवते ने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. मुकाभिनय मध्ये शरद पवार कृषी महाविद्यालय, खरवते संघ द्वितीय क्रमांकचा विजेता तर एकांकिका मध्ये तृतीय क्रमांकचा विजेता ठरला. स्थल छायाचित्रण या कलाप्रकारामध्ये कु.सिद्धार्थ राणे (अन्नतंत्रज्ञान) याने द्वितीय क्रमांक पटकावला. नृत्य या सर्व साधारण कलाप्रकारामध्ये कृषि महाविद्यालय,खरवते संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli

मयुरपंख 2025 मधील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे मान.आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे, मान.महेश महाडिक, सेक्रेटरी, मान.संस्था संचालक,व शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुकपर अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागाचे प्रा.विक्रांत साळवी, प्रा.सुशांत कदम,प्रा.निशिकांत पाकळे, प्रा.अंकीता पाटील, प्रा.अस्मिता टकले तसेच शिक्षकेतर कर्मचारी व कलादिग्दर्शक शेखर मुळ्ये, संगीत दिग्दर्शक अक्षय पेडणेकर,नृत्य दिग्दर्शक सागर कुंभार व सहकारी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. “Mayurpankh – 2025” organized in Dapoli