केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते राजेश बेंडल यांचा गौरव
गुहागर, ता. 06 : गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor of Guhagar honored in Goa) यांना राष्ट्रीय आदर्श नगराध्यक्ष या पुरस्काराने गौरविण्यात आले. गोव्यातील मडगांव येथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Minister of State for Tourism) यांनी मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राजेश बेंडल यांचा सत्कार केला. हा सन्मान गुहागर शहरातील नागरिक, समाज संघटना, शहर विकास आघाडी आणि गुहागर नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी यांचा असल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले.
हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड आणि श्री स्वामी समर्थ मंदिर, समर्थगड मडगांव गोवा यांच्या वतीने महाराष्ट्र आणि गोव्यासह अन्य राज्यातील 21 व्यक्तींचा सत्कार मडगांव मध्ये करण्यात आला. यावेळी गोव्यातील नावेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर (MLA Ulhas Tuenkar), माजी खासदार नरेंद्र सावईकर, डॉ. सुनिल फडतरे, गौरव नायकवाडी उपस्थित होते. सत्कारमुर्तींमध्ये समाजसेवक, आयुर्वेदाचार्य, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक, उद्योजक, शेतकरी, शिक्षक आदी क्षेत्रांचा समावेश होता. सर्व जाती धर्मातील, वयोगटातील पुरस्कारार्थींची निवड हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्थने केली होती. समाजातील विविध क्षेत्रात काम उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींना गेली तीन वर्ष ही संस्था मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देत आहे. (Mayor of Guhagar honored in Goa)


Mayor of Guhagar honored in Goa
राजेश बेंडल यांचा राजकीय प्रवास पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती असा झाला. या काळात त्यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरी क्षेत्रात काम करताना गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागात विकास कामे केली. अनुभवाच्या बळावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधुन निधी आणला. त्याबद्दल त्यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल फडतरे यांनी सांगितले. (Mayor of Guhagar honored in Goa)


एकमेव सत्कारमुर्ती व्यासपीठावर
विशेष म्हणजे राजेश बेंडल हे एकमेव सत्कारमुर्ती होते ज्यांना आयोजकांनी कार्यक्रमाच्या सुरवातीपासून व्यासपीठावर स्थान दिले होते. स्वाभाविकच केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे आमदार उल्हास तुयेकर यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी राजेश बेंडल यांना मिळाली. (Mayor of Guhagar honored in Goa)


शहराच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय
या पुरस्काराबद्दल गुहागर न्यूजशी बोलताना नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, नगराध्यक्ष होण्याची संधी गुहागरमधील नागरिकांनी, गुहागर असगोली समाज संघटना आणि शहर विकास आघाडीमुळे मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करीत आहे. कोणावरही आरोप न करता, कोणालाही दोष न देता, शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मिळालेल्या पुरस्काराने आपण योग्य दिशेने आणि योग्य पध्दतीने वाटचाल करत आहोत हे अधोरेखित झाले आहे. (Mayor of Guhagar honored in Goa)