खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने भव्य आयोजन
गुहागर, ता. 13 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (DLLE) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर स्वदेशी मोहिमे अंतर्गत मॅरेथॉन रन आयोजित करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांच्या १६४ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यास अभिवादन करणे. त्याच बरोबर युवकांमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, एकीचे बळ, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी गुणांची जोपासना करणे हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश होता. Marathon on the occasion of Swami Vivekananda Jayanti

ही मॅरेथॉन तीन टप्प्यात पार पडली. महाविद्यालय बस स्टॉप पासून सुरु होऊन-सिव्हिल हॉस्पिटल-बसस्टँड व पोलिस ग्राऊंड पर्यंत अशी ०२ कि.मी. मॅरेथॉन पार पडली. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यात गुहागर पोलीस कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय गुहागर, मा.श्री.विपुल कदम यांची ॲम्बुलन्स, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 100 जणांनी सहभाग घेतला होता. Marathon on the occasion of Swami Vivekananda Jayanti
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. प्रमोद आगळे, डॉ. रामेश्वर सोळंके, जनरल सेक्रेटरी-सुरज पवार यांनी विशेष कष्ट घेतले. प्रभारी प्राचार्य डॉ गायकवाड यांनी सर्वांच्या सहकार्यबद्दल पोलीस ग्राऊंड वर पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. शेवटी प्रा. रामेश्वर सोळंके यांनी सर्वांचे आभार मानले आणि मॅरेथॉन रन ची सांगता झाली. Marathon on the occasion of Swami Vivekananda Jayanti
