नगरपंचायतीचे आयोजन, नोंदणीसाठी ऑॅनलाईन अर्ज
गुहागर, ता. 18 : येथील समुद्रकिनाऱ्यावर ब्लू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुहागर नगरपंचायत या स्पर्धेची आयोजक आहे. पाच वर्षांपूर्वी गुहागर नगरपंचायत व शासनाने पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध वयोगटातील धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. Marathon at Guhagar beach

गुहागरच्या समुद्रावर आता विविध स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. यामध्ये बीच कबड्डी, बीच हॉलीबॉल, धावणे या खेळप्रकारांचा समावेश आहे. याशिवाय वाळू शिल्प सारखी कला येथे रुजावी म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. यातून पर्यटकांच्या हंगामात शिल्पकारांनी समुद्रकिनारी वाळू शिल्प बनवावी असे अपेक्षित आहे. असे विविध उपक्रम गुहागरच्या समुद्रावर होत आहेत. Marathon at Guhagar beach

याच उपक्रमाचा भाग म्हणून गुहागर नगरपंचायतच्या वतीने दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता गुहागर समुद्रकिनाऱ्यावर ब्लू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा नोंदणीसाठी पुढील लिंक वापरावी. https://forms.gle/3rL8tzmQxDtAYtBh6 तसेच अधिक माहितीसाठी ओंकार लोखंडे 8007303190 व सुरज सकपाल 7756057983 यांच्याकडे संपर्क साधावा. तरी या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील धावपटुंनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी केले आहे. Marathon at Guhagar beach
