• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेतचे विद्यार्थी झळकले मराठी मालिकेत

by Mayuresh Patnakar
April 23, 2022
in Guhagar
21 1
0
Marathi Serial shooting in palshet
42
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिग्गज कलाकारांन सोबत केला अभिनव; चित्रिकरण अनुभवले

गुहागर ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.च्या पालशेत नं.१ आदर्श प्रशाळेचे विद्यार्थी कलर्स मराठी वाहिनीवरील “भाग्य दिले तु मला” या मालिकेत झळकत आहेत. सदर मालिकेचे दोन टप्प्यातील चित्रीकरण पालशेत नं १ प्रशाला व पालशेत परिसरात संपन्न झाले.  Marathi Serial shooting in palshet

“भाग्य दिले तू मला” ही मराठी मालिका कश्मिरा पठारे यांच्या विराट इंटरटेनमेंट तर्फे निर्मित आहे. कलर्स मराठी या मराठी वाहिनीवर  या मालिकेचे प्रक्षेपण 4 एप्रिल पासून सुरू झाले आहे.  या मालिकेची पटकथा अमोल पाटील यांनी लिहिली असून चैतन सैंदाणे यांनी संवाद लेखन केले आहे. मालिकेचे दिग्दर्शक सागर खेऊर आहेत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेमध्ये रत्नमाला ही व्यक्तिरेखा साकारत असून त्यांच्यासोबत अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेदार, प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. Marathi Serial shooting in palshet

या मालिकेचे चित्रिकरण पालशेत नं १ प्रशाला व पालशेत परिसरात झाले.  या निमित्ताने पालशेत नं. 1 मधील विद्यार्थ्यांना टि.व्ही. वर दिसणाऱ्या मालिकांचे चित्रिकरण कसे होते हे जवळून अनुभवता आले.तसेच विद्यार्थ्यांना चित्रिकरणामध्ये थेट काम करण्याची संधी मिळाली ही मालिका सध्या टि.व्ही. वर दिसत असल्याने पालशेत शाळेतील मुलांना टि.व्ही. वर पाहण्याची संधी पालकांना मिळाली आहे. इतकेच नव्हे तर प्रशालेतील ओवी चव्हाण, श्रावणी हेदवकर, स्वराजराजे राशिनकर, सेजल साळुंके व अन्य विद्यार्थ्यांना या चित्रिकरणात अभिनयाची संधी मिळाली आहे. Marathi Serial shooting in palshet

याबद्दल मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे, चिंतामणी गायकवाड, केंद्रीय प्रमुख श्रीकांत वेल्हाळ, पालशेत प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिष चव्हाण, उपाध्यक्ष प्रित पटेकर  मुख्याध्यापिका दर्शना समगिस्कर, उपशिक्षक संतोष गावडे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व पालक बंधु भगिनींनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. Marathi Serial shooting in palshet

या मालिकेचे चित्रिकरण पालशेत नं १ मध्ये करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच या निमित्ताने प्रशालेत अनेक मान्यवर मंडळी आल्याबद्दल मुख्याध्यापिका दर्शना समगिस्कर, उपशिक्षक संतोष गावडे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ, व अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले, जेष्ठ दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक सागर खेऊर कलर्स मराठी वाहिनीचे कार्यकारी निर्माता मयुरेश वाघे, बालकलाकार पृथा सैदाणें, आर्चिस तवसाळकर, रोमांच देवळेकर व अन्य कलाकार टीमचे स्वागत केले. आभार मानले. Marathi Serial shooting in palshet

Tags: ActorActressColors Marathi channelGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarathi Serial shooting in palshetMarathi SerilNews in GuhagarPalshetSchoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.