गुहागर महाविद्यालयात ज्येष्ठ कवी श्री. राष्ट्रपाल सावंत व श्री ज्ञानेश्वर झगडे उपस्थित
गुहागर, दि. 28 : येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये (Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir and Junior College) मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानरश्मि वाचनालयाचे (Gyan Rashmi Vachnalay) अध्यक्ष व मसाप, शाखा गुहागरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, खरे-ढेरे- भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सावंत उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवी श्री. राष्ट्रपाल सावंत, श्री ज्ञानेश्वर झगडे निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होते. Marathi Official Language Day


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी आडेकर यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी मोहिते या विद्यार्थिनीने केले. मराठी दिनाची माहिती व मराठी भाषेचे जीवनातील व शिक्षणातील महत्त्व तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची धडपड मराठी विषयाच्या प्रा. मनाली बावधनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. Marathi Official Language Day
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वरचितकविता, गुहागर तालुक्यातील कवींच्या कविता सादर केल्या. निमंत्रित कवींनी या कवी संमेलनामध्ये बहार आणली. श्री. राजेंद्र आरेकर यांनी निसर्ग कविता सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली. ज्येष्ठ कवी राष्ट्रपाल सावंत यांनी आपल्या शैलीतून कवितांचे सादरीकरण केले. साक्षरता अभियान, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा अशा सामाजिक आशयावर प्रकाश टाकणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी हसवत आपल्या विनोदी शैलीतून कवितांचे सादरीकरण केले. कविता कशी जन्माला येते? तीची मांडणी कशी करावी, कशी सादर करावी याचे मार्गदर्शन निमंत्रित कवींनी केले. Marathi Official Language Day
प्राचार्य डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आडेकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व तिचे व्यवहारातील स्वरूप व नोकरीची संधी याबाबत मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः नियोजित केला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. बावधनकर व प्रा. पालशेतकर यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. सर्व प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. Marathi Official Language Day

