उपाध्यक्षपदी सत्यवान घाडे, सर्वानुमते नव्या कार्यकारीणीची नियुक्ती
गुहागर, ता. 28 : रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या गुहागर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज बावधनकर व उपाध्यक्ष पदी सत्यवान घाडे यांची निवड करण्यात आली. गुहागर तालुका पत्रकार संघाच्या सभेत सर्वानुमते नव्या कार्यकारणीची नियुक्त करण्यात आली. Manoj Bavdhankar New President of Journalists Association.

गुहागर तालुका पत्रकार संघ गेली 24 वर्ष कार्यरत आहे. या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने गुहागर तालुका पत्रकार संघ करत आला आहे. लोककलांना प्रतिष्ठा मिळावी. तालुक्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे. येथील पर्यटन उद्योगाचा विकास व्हावा. गुहागरातील विविध समस्यांची मांडणी वृत्तपत्रातून सातत्याने पत्रकार करत असतात. त्याचबरोबर येथील उद्योजकांना जगासमोर आणण्यासाठी, यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वांना समजावे म्हणूनही गुहागर पत्रकार संघ सातत्याने व्यापक लिखाण करत आला आहे. याशिवाय कोविड संकटात व चिपळूणच्या महापुरातील मदत कार्यातही गुहागरच्या पत्रकारांनी सक्रीय सहभाग घेतला. पत्रकार संघाच्या या कार्याची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार दिला. Manoj Bavdhankar as President of Journalists Association
पत्रकार संघाच्या कार्यपध्दतीमध्ये दर दोन वर्षांनी नेतृत्त्वाची संधी प्रत्येक सदस्याला मिळावी अशी रचना आहे. त्यामुळे पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडही नेहमीच सर्वानुमते होत असते. 2023 ते 2025 या कालावधीसाठी गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून मनोज बावधनकर, उपाध्यक्ष सत्यवान घाडे, सचिव निलेश गोयथळे व खजिनदार संकेत गोयथळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार मंदार गोयथळे, संतोष घुमे, गणेश धनावडे, मनोज बावधनकर, सत्यवान घाडे, संकेत गोयथळे, निलेश गोयथळे आदी उपस्थित होते. Manoj Bavdhankar as President of Journalists Association

जुने जाणते पत्रकार मनोज बावधनकर
वृत्तपत्र वितरक आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहबंधांमुळे विविध वृत्तपत्रांना गुहागरातील बातम्या पाठविण्याचे काम बावधनकर कुटुंब गेली अनेक वर्ष करत आहे. हाच वारसा घेवून मनोज बावधनकर यांनी लोकसत्तामधुन आपल्या पत्रकारीतेला सुरवात केली. दै. सागरचे संपादक कै. निशिकांत तथा नाना जोशी, दै. रत्नागिरी टाईम्सचे संपादक श्री. घोसाळकर यांच्याशी बावधनकर परिवाराचे व्यवसायापलीकडील नाते होते. त्यामुळे मानधन, प्रवास खर्च असा कोणताही आर्थिक व्यवहार न ठेवता अनेक वर्ष मनोज बावधनकर काम करत होते. सध्या दै. पुढारीचे तालुका प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.
गेल्या काही वर्षात डिजिडल मिडियाचे प्रस्थ वाढले. अनेक पत्रकारांनी आपल्या तालुक्याचे मुखपत्र म्हणून, कोकणचे मुखपत्र म्हणून डिजिटल माध्यमांवर काम सुरु केले होते. कोरोना काळात वृत्तपत्राबरोबर सामाजिक माध्यमांमधुन येणाऱ्या बातमीपत्रांनाही समाजाने स्विकारले. या पार्श्र्वभुमीवर मनोज बावधनकर यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या साथीने गुहागर न्यूज हे वेब न्यूज पोर्टल सुरु केले. आज गुहागर तालुक्यातील प्रभावी वेब न्यूज पोर्टल अशी गुहागर न्यूजची ओळख बनली आहे. Manoj Bavdhankar as President of Journalists Association

मावळत्या अध्यक्षांच्या शुभेच्छा
पत्रकार संघाच्या कार्यकारीणीमध्ये त्यांच्या सोबतीला सत्यवान घाडे, संकेत गोयथळे, यांच्यासारखे प्रभावी पत्रकारीता करणारे सहकारी आहेत. आंतराराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, उत्तम क्रिडा प्रशिक्षक, सुत्रसंचालक, अशी ओळख असणारे निलेश गोयथळे हे पत्रकार संघाचे सचिव म्हणून जोडीला आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षात गुहागर तालुका पत्रकार संघाचे काम अधिक जोमाने वाढेल. अशा शुभेच्छा मावळते अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिल्या आहेत. Manoj Bavdhankar as President of Journalists Association
