लष्कराच्या जवानांसह 200 हून अधिक ग्रामस्थ बेपत्ता
मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी जिल्ह्यात तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. 29) रात्री भूस्खलन झाले. यामध्ये 200 हून अधिक ग्रामस्थ आणि जवान ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 7 जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची विश्र्वसनीय माहिती आहे. तातडीने मदत आणि बचाव कार्याला सुरवात झाल्याने 13 जवानांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एन.डी.आर.एफ.ला यश आहे. खराब हवामान आणि सातत्यानं भूस्खलन सुरु असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत. Manipur Landslide

Manipur Landslide
मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी जिल्ह्यात तुपुल रेल्वे स्थानकाजवळ इम्फाळ-जिरिबाम रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरु आहे. याठिकाणी दहशतवादी हल्ले होत असल्याने रेल्वेमार्गाच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भुस्खलन झाले. यामध्ये लष्करी जवानांचा एक संपूर्ण कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. भूस्खलनाच्या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने बचाव कार्य सुरू केले. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत 13 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सर्व जखमींवर नोनी आर्मी मेडिकल युनिट येथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना इम्फाळ आणि इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. Manipur Landslide

बचावकार्यात अडथळे
लष्कराच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि पुन्हा भूस्खलन झाल्यामुळे त्याचा बचाव कार्यावर परिणाम होत आहे. लष्कर, एन.डी.आर.एफ, आपत्ती निवारण कर्मचारी आणि पोलिस बुलडोझरसारखी उपकरणे वापरत आहेत. परंतु भुसभुशीत जमिनीमुळे जड उपकरणे हलविणे कठीण होत आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांपैकी सात टेरिटोरियल आर्मीचे सदस्य आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतीय रेल्वेचे पाच अधिकारी आहेत. Manipur Landslide

पंतप्रधानांची घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याशी यांच्याशी संवाद साधून भूस्खलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर केलेल्या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंगजी यांच्याशी बोलून दुर्दैवी अशा भूस्खलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा, अशी मी प्रार्थना करतो. Manipur Landslide

