भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार प्रदान
गुहागर, ता. 09 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तळवळीतील महेश शिगवण यांना साप्ताहिक भगवे वादळच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार देऊन नुकतेच मुंबई येथे गौरविण्यात आले. Mahesh Shigwan
तालुक्यातील तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सध्या व्यावसायानिमित्त दुबई येथे वास्तव्यास असणारे महेश शिगवण यांनी बाहेरगावी राहूनही आपल्या जन्मभूमीसाठी कायम मदतीचा हात देत असतात. कोरोना काळात त्यांनी गरीब व गरजूंना मदतीचा हात दिला होता. त्याचप्रमाणे इतर सामाजिक स्तरावर देखील त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन साप्ताहिक भगवे वादळ यांनी आपल्या पहिल्या वर्धापनदिनी महेश शिगवण यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार 2022 ने गौरव केला. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा मयूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार धारावी येथील कार्यक्रमात स्वीकारला. या पुरस्काराबद्दल महेश शिगवण यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Mahesh Shigwan
