• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी श्री उमामहेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव

by Guhagar News
February 18, 2026
in Guhagar
22 0
0
Mahashivratri celebrations at Hedvi
43
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निसर्गरम्य हेदवी समुद्रकिनारी वसलेल्या श्री उमामहेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्ती भावाने ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत साजरा करण्यात आला. Mahashivratri celebrations at Hedvi

महाशिवरात्री निमित्त उमामहेश्वर विकास मंडळ हेदवी मंडळाच्यावतीने श्रींचे मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. श्रींचे पुजारी श्री हेदवीकर कुटुंबियांकडून सकाळी ७ वाजता श्री उमामहेश्वरांची मंत्रोक्त महापूजा करण्यात आली. दुपारी 11 वाजता उमामेश्वर विकास मंडळाची सवाद्य दिंडी निघाली. दिंडीमध्ये वाडीतील सर्व ज्येष्ठ तरुण महिला लहान मुलांनी उत्साहाने भाग घेऊन मोठ्या भक्ती भावाने दिंडी वाडीतून मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. दिंडीची सांगता करताना मंदिरामध्ये

शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ।
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ॥

या शंकराच्या नावाचा मोठ्या प्रमाणत गजर करून  दिंडीची सांगता करण्यात आली. Mahashivratri celebrations at Hedvi

हे मंदिर समुद्र किनारी असल्याने तसेच मंदिराच्या मागे खडकामध्ये निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजेच  ब्राम्हण घलई हे प्रसिद्ध ठिकाण असल्याने  मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पंचक्रोशीतील अनेक भाविक दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर सजवण्यात आले होते. संपूर्ण विद्युत रोषणाई आणि स्पीकरची व्यवस्था श्री निखिल विष्णू ओक यांनी केली होती. तर  फुलांच्या सजावटीसाठी हेदवी गावातीलच मात्र मुंबई येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री प्रमोद भाटकर, श्री गणेश बोरकर आणि सहकारी यांनी स्वखर्चाने सर्व सजावट केली. रात्री ठीक १०.३० वाजता  कृपा सिंधू प्रासादिक भजन मंडळ तळवली-गुहागर बुवा श्री कौशल पिलवलकर यांनी अतिशय सुश्राव्य असे भजन सादर केले. मंदिरामध्ये जमलेले सर्व भाविकांनी भजनामध्ये  तल्लीन होऊन आनंद घेतला त्यानंतर उमामहेश्वर विकास मंडळाची आरती व प्रसाद घेऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. Mahashivratri celebrations at Hedvi

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahashivratri celebrations at HedviMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.