• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया

by Manoj Bavdhankar
November 14, 2022
in Maharashtra
19 0
0
Mahasanskriti Konkan Sanman 2022

Mahasanskriti Konkan Sanman 2022

36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंत्री दीपक केसरकर, महासंस्कृतीने केला कोकणवासीयांचा सन्मान

गुहागर, ता. 12 राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया. असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी केले. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात Mahasanskriti Konkan Sanman 2022 या कार्यक्रमात बोलत होते.

Mahasanskriti Konkan Sanman 2022
Mahasanskriti Konkan Sanman 2022 : ‘द अनएक्सप्लोरड् लेगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर

महासंस्कृती व्हेंचर्स (Mahasanskriti Ventures) या संस्थेच्या वतीने कोकणात उद्योग, सामाजिक बदल, संवर्धन, पत्रकारिता, कृषी, कला, इतिहास, शिक्षण, व्यवसाय, रिअल इस्टेट आणि इतर (Industry, social change, conservation, journalism, agriculture, art, history, education, business, real estate, etc) अनेक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करून संस्कृती जपण्यात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना Mahasanskriti Konkan Sanman 2022

यामध्ये दापोलीतील वाणीतील व्यंगावर उपचार करणाऱ्या रेखा बागुल, रांगोळी कलाकार मनोज पाटील, पर्यावरण विषयक काम करणारे दापोलीचे दिलीप कुलकर्णी, लोककला जपणारे गुहागर तालुक्यातील असगोलीचे श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ, कातळशिल्प संवर्धन विषयात काम करणारी निसर्गयात्री संस्था, समाजसेवा करणारे राजरत्न प्रतिष्ठान रत्नागिरी, शिक्षण क्षेत्रात काम करणारे देवरुखचे सदानंद भागवत, पालघरचे डॉ. विशाल कोडग्रीकर, उद्योजक मुकेश गुंदेचा, निसर्ग संवर्धनविषयी काम करणारे रत्नागिरीचे सुरेंद्र ठाकुरदेसाई, संगीत क्षेत्रात का करणारे उमाशंकर दाते, राजापुरच्या अपुर्वा मराठे, उद्योजक अपुर्व फर्नांडिस, पत्रकार मयुरेश पाटणकर, प्रशांत परांजपे, डॉ. सुरेखा पाटील, कलाकार संजय पऱ्हाड, कोकणच्या संस्कृती संदर्भात सामाजिक माध्यमांवर कंटेन्ट तयार करणारे श्रेयस कुलकर्णी, प्रगट लोके, अंकिता वालावलकर, अनिकेत रासम, सतीश रहाटे व भाडीपा टीम यांचा सन्मान शिक्षण मंत्री दीपक केसरकर व देशातील सर्वात लहान उद्योजक म्हणून ओळखले जाणारे अक्षय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.  

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, कोकणचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. जंगल, किल्ले, समुद्र किनारे असा विविधांगी सर्वोत्तम निसर्ग कोकणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन समुद्री किल्ले उभारले. जेवढे बॅक वॉटर केरळमध्ये आहे तेवढे कोकणातही आहे. कोकणवासियांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी. मातृभुमीचे ऋण फेडण्याचे काम महासंस्कृती व्हेंचर काम करीत आहे. त्याचबरोबर कोकणचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहनही देत आहे. हे सर्वजण निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. Mahasanskriti Konkan Sanman 2022

महासंस्कृती वेंचर्स आयोजित महासंस्कृती कोकण सन्मान पुरस्कार २०२२ चे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉईंट मुंबई येथे करण्यात आले होते. विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्याचे भाग्य यावेळी मला मिळाले. pic.twitter.com/MorKX9cMC1

— Deepak Kesarkar (@dvkesarkar) November 11, 2022

Mahasanskriti Konkan Sanman 2022 या कार्यक्रमाला महासंस्कृती व्हेंचर्सच्या संस्थापक संचालक शिल्पा परांडेकर, संचालक ऋतुराज हेसी यांच्यासह कोकणातील अनेकजण उपस्थित होते. कोकणातील संस्कृतीचा वारसा दाखविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

असगोलीच्या संकासुराची मुंबईत चर्चा

गुहागर तालुक्यातील असगोली गावच्या श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळाला Mahasanskriti Konkan Sanman 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मंत्रालय परिसरात नमन मंडळाने संकासुर आणि खेळ्यांचे (Folk-art) सादरीकरण केले. हे सादरीकरण अनेकांना इतके आवडले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आलेल्या अनेक पत्रकारांनी, युट्युबर्सनी संकासुर आणि खेळ्यांचे चित्रीकरण केले. ही लोककला (Folkart) काय आहे हे समजुन घेण्यासाठी नमन मंडळातील कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील सभागृहाच्या प्रवेशद्वारावर थांबुन या लोककलेचा आनंद लुटला. Mahasanskriti Konkan Sanman 2022

Mahasanskriti Konkan Sanman 2022
Mahasanskriti Konkan Sanman 2022 हा पुरस्कार देवून मयूरेश पाटणकर यांना गौरविताना जेनरिक आधार उद्योगाचे निर्माते अक्षय देशपांडे

गुहागर न्यूजच्या मयूरेश पाटणकर यांचा सन्मान

गुहागर न्यूजचे संचालक आणि दै. सकाळचे बातमीदार मयूरेश पाटणकर यांना देखील Mahasanskriti Konkan Sanman 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुहागरमधील लोककला, संस्कृती, पर्यटन या संदर्भात मयूरेश पाटणकर यांनी दै. सकाळ, साप्ताहिक सकाळ मध्ये लेखन केले आहे. शिवाय गुहागरमधील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन (Olive Ridley Turtle Conservation) मोहिम, संकासुर आणि खेळे, विविध उत्सव या संदर्भातील विविध प्रकारच्या कंटेन्टची निर्मिती त्यांनी केली आहे. याची दखल घेवून महासंस्कृती व्हेंचर्सने त्यांना सन्मानित केले. Mahasanskriti Konkan Sanman 2022

Tags : Mahasanskriti Konkan Sanman 2022, Education Minister, Deepak Kesarkar, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Folk-art,

Tags: Deepak KesarkarEducation MinisterFolk-artGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahasanskriti Konkan Sanman 2022Marathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.