• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्र पर्यटन दृष्टी 2047

by Guhagar News
June 16, 2025
in Maharashtra
71 0
9
139
SHARES
396
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 भविष्याचा आराखडा, जनतेच्या सहभागातून…

गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे, एक अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि सृजनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे — “Vision 2047: पर्यटनाची नवी दिशा, नव्या संधी!” या संकल्पनेखाली पर्यटन क्षेत्राचा व्यापक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्यातील नागरिकांचे मत संकलित केले जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकाराने या व्यापक मोहिमेअंतर्गत राज्यभरातील जनतेसाठी एक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश 2047 पर्यंत महाराष्ट्राला एक शाश्वत, सर्वसमावेशक, आणि जागतिक दर्जाचं पर्यटन गंतव्य बनवण्याचा आहे. Maharashtra Tourism Vision 2047

या सर्वेक्षणाद्वारे केवळ आकडेवारीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न, त्यांची अनुभवसंपन्न निरीक्षणं आणि त्यांच्या अंतःकरणातील अपेक्षा हळुवारपणे उलगडली जाणार आहेत. कुठे कोकणची निळसर किनारपट्टी, तर कुठे सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट, कुठे भक्‍कम वारसा स्थळं, तर कुठे धार्मिक श्रद्धेचे केंद्रबिंदू – या साऱ्यांची जाणीवपूर्वक छाननी यामध्ये केली जाणार आहे. Maharashtra Tourism Vision 2047

पर्यटनप्रेमी नागरिकांनी विविध घटकांवर मत नोंदवायचे आहे – जसे की प्रवास सुलभता, स्वच्छता, सुरक्षितता, माहितीची उपलब्धता, स्थानिकांचे सौहार्द आणि पर्यटन सेवांचा दर्जा. तसंच, 2047 पर्यंतच्या पर्यटनाच्या भविष्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका, शाश्वत पर्यटनाच्या दिशा, सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा पुनर्जन्म, तरुणाईसाठी साहस पर्यटनाच्या नव्या वाटा, आणि आरोग्य-आधारित वैद्यकीय पर्यटनाची संधी यांवर भर दिला जाणार आहे. Maharashtra Tourism Vision 2047

राज्य शासनाने नागरिकांना या संवादात सहभागी करून घेत त्यांच्या अपेक्षांना दिशा देण्याचे नवे पर्व सुरू केले आहे. आजचा पर्यटक केवळ प्रवासी राहिलेला नसून, तो अनुभवाचा शोधकर्ता झाला आहे – आणि या अनुभवांचे स्वप्न महाराष्ट्र 2047 मध्ये उलगडू पाहत आहे. या संदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि विविध क्षेत्रांतील भागीदार संस्थांच्या सहकार्याने विविध जिल्ह्यांतून नागरिकांची मते संकलित केली जात आहेत. या सर्वेक्षणात पर्यटनप्रेमी नागरिकांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. पर्यटनाचा वर्तमान अनुभव – ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, घाटमाथ्यावरील थंड हवेची ठिकाणं, अभयारण्यं, धार्मिक व सांस्कृतिक स्थळे, साहसी व ग्रामीण पर्यटन यामधील प्राधान्यक्रम. Maharashtra Tourism Vision 2047

सुविधा व अडचणी – रस्ते व दळणवळण, निवास व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता, स्थानिकांचे आतिथ्य, माहितीची उपलब्धता, आणि पर्यटकांच्या समाधानाचे मूल्यांकन.
 2047 ची पर्यटन दृष्टिकोन – शाश्वत व पर्यावरणपूरक पर्यटन, डिजिटल व तंत्रज्ञानाधारित अनुभव (AI गाईड्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी टूर), समुदाय-आधारित पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, संस्कृती व वारसा पर्यटन, साहसी व वैविध्यपूर्ण अनुभव.
 शासनाचे प्राधान्य क्षेत्र – पायाभूत सुविधा, कौशल्यविकास, जागतिक ब्रँडिंग, नव्या स्थळांचा विकास, कचरा व्यवस्थापन, खासगी गुंतवणूक प्रोत्साहन आणि नियम सुलभीकरण. Maharashtra Tourism Vision 2047

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि MTDC हे सुनिश्चित करत आहेत की, पुढील 25 वर्षांचा पर्यटन विकास हा लोकसहभागातून, नवकल्पनांवर आधारित आणि पर्यावरणीय जाणिवांसह प्रगतीकडे नेणारा ठरेल. हे सर्वेक्षण म्हणजे एक पर्यटनाचा नवा आरसा आहे, जनतेच्या मतांचा, महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या उज्वल भविष्याचा असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मा.मनोजकुमार सुर्यवंशी, (भाप्रसे) यांनी व्यक्त केले आहे. Maharashtra Tourism Vision 2047

या सर्वेक्षणाची संकल्पना ही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा. शंभुराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री मा. इंद्रनील नाईक यांची असुन या उपक्रमास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. अतुल पाटने हे मार्गदर्शन करीत आहेत. महामंडळाचे मा. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर्वांशी समन्वय साधुन सदर बाबत कार्यवाही करीत आहेत, अशी माहीती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले असुन सदरच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी अधिकृत लिंक खालीलप्रमाणे असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. Maharashtra Tourism Vision 2047

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra Tourism Vision 2047Marathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.