राष्ट्रपतींनी केली जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
गुहागर, ता. 11 : महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. त्यांचा राज्यपाल पदाचा शपथविधी सोहळा १० मार्चला संपन्न झाला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यापासून हे पद रिक्त होते. Maharashtra Governor
त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली. Maharashtra Governor
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

सोमवारी जिष्णू देव वर्मा (Maharashtra Governor) त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देखील दिला. यावेळी देखील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यानंतर आता मुंबईमध्ये जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. Maharashtra Governer
महाराष्ट्रात येण्यापूर्वी जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Rashtrapati Draupadi Murmu) यांनी अलिकडेच केलेल्या फेरबदलानंतर त्यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे. सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यापासून आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होताना हे पद रिक्त होते. यानंतर आता जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. Maharashtra Governer

जिष्णू देव वर्मा कोण आहेत?
Jishnu Dev Varma हे मूळचे त्रिपुरा (Tripura) राज्यातील आहेत. त्यांच्या जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी आगरतळा येथे माणिक्य घराण्यात झाला. ते केवळ एक अनुभवी राजकारणी नाहीत तर त्यांना कला आणि संस्कृतीचीही खूप आवड आहे. त्यांनी १९९० च्या दशकात भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ ते २०२३ दरम्यान त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, त्यांनी अर्थ, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली.
