एकनाथ शिंदे वीसपेक्षा जास्त आमदारांसह सुरतला
मुंबई, ता.21: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाननंतर आपल्या समर्थक आमदारांसह अज्ञातवासात गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ११ ते १३ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यास ठाकरे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. Maharashtra government in trouble
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. तसेच विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १३४ मतं मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. भाजपकडे स्वतःचे १०६ आणि ७ अपक्ष आमदार धरून ११३ इतके संख्याबळ आहे. मात्र, विधानपरिषदेचा निकाल पाहता भाजपने महाविकास आघाडीची तब्बल २१ मतं फोडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणखी काही आमदार मंत्र्यांसह अज्ञातवासात गेले आणि महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला. Maharashtra government in trouble
एकनाथ शिंदेंसोबत तब्बल 29 आमदार
विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाल्यावर रात्री उशीरा शिवसेनेने वर्षावर आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि 29 आमदार गैरहजर होते. या सर्व आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून सातत्याने संपर्क केला जात होता. मात्र, सर्वांचेच फोन नॉट रिचेबल आहेत. यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. शिवसेनेनी खासदारांना देखील मुंबईमध्ये दाखल होण्याच्या सूचना दिल्या. Maharashtra government in trouble
हे मंत्री व आमदार आहेत शिंदेंसोबत
1. एकनाथ शिंदे
2. शंभूराज देसाई
3. अब्दुल सत्तार
4. संदीपान भुमरे
5. भरत गोगावले
6. महेंद्र दळवी
7. संजय शिरसाठ
8. विश्वनाथ भोईर
9. बालाजी केणीकर
10. किमा दाबा पाटील
11. तानाजी सावंत
12. महेश शिंदे
13. थोरवे
14. शहाजी पाटील
15. प्रकाश आबिटकर
16. अनिल बाबर
17. किशोर अप्पा पाटील
18. संजय रायमुलकर
19. संजय गायकवाड
20. शांताराम मोरे
21. लता सोनवणे
22. श्रीनिवास वणगा
23. प्रकाश सुर्वे
24. ज्ञानेश्वर चौगुले
25. प्रताप सरनाईक
26. यामिनी जाधव
राजकीय भूकंप होणार नाही -खासदार संजय राऊत
एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. शिवसैनिक आमच्याकडे परत येतील. राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही. असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. Maharashtra government in trouble खासदार राऊत म्हणाले की, आमचे काही आमदारांशी संपर्क होत नाही हे खर आहे. ते मुंबईत नाही. काही गैरसमजातून त्यांनी गुजरातला नेण्यात आलं असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेसुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झाला आहे. जे चित्र बाहेर निर्माण केलं जात आहे की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, ते लवकरच निवळेल. Maharashtra government in trouble