महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना () निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. Maharashtra Corona Restriction Free
कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी. असे आवाहन सरकारने केले आहे. Maharashtra Corona Restriction Free
जवळपास मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध होते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे निर्बंध कडक करण्यात आले होते. निर्बंधाच्या काळात लसीकरणही वेगाने झाले. परिणामी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्बंधमुक्त होत आहे. तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद यासारखे सण-उत्सव उत्साहात साजरे करता येणार आहेत.
Maharashtra Corona Restriction Free
मास्क फ्री महाराष्ट्र
आता महाराष्ट्रात मास्क वापरणं बंधकारक नाही, परंतु ते ऐच्छिक असणार आहे. म्हणजेच तुम्ही आता मास्क वापरला नाही म्हणून तुमच्यावर कोणीही कारवाई करणार नाही. पोलिस किंवा इतर कुठलीही प्रशासन तुम्हाला कसल्याही प्रकारचा दंड करू शकणार नाहीत. मास्क फ्री महाराष्ट्र कायदेशीरपणे जाहीर केला असला तरीसुद्धा तो ऐच्छिक ठेवलाय.
उपस्थितींवर मर्यादा नाही
कोविडच्या काळात लग्न आणि इतर समारंभासाठी मोठी बंधने राज्य सरकारकडून लागू केली होती. पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा होत्या. आता कोविडचे सर्व बंधनं राज्यातून हटवली आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्ही हवे तेवढे पाहुणे, मित्रं बोलावू शकता. आनंदानं साजरा करु शकता. हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, नाट्यगृह, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही. पूर्ण क्षमतेने या आस्थापना चालवता येणार आहेत.
लसीचे प्रमाणपत्राची गरज नाही
बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लसीचे प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लसीचे प्रमाणपत्र दाखवण्याची गरज भासणार नाही.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसह मोठ्या शहरात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अशा ठिकाणी निर्बंध होते. ते बंद करण्यासाठीही वेळेची मर्यादा होती. पण कोरोना निर्बंध हटल्याने कोरोना पूर्वीच्या वेळेनुसार बार चालू रहातील.
महाराष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त झाले आहेत. त्यामुळे चैत्र महिन्यापासून राज्यात सुरू होणाऱ्या यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार आहेत.