गुहागरची उर्वी किरण बावधनकर, किलबिल गटात प्रथम
गुहागर, ता.17 : 23 व्या राज्यस्तरीय “महाराष्ट्राचा बालकवी” या काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने मराठी साहित्य संस्कृती रुजावी, ती संवर्धित व्हावी. यासाठी घेण्यात येते. यावर्षी स्पर्धेत सर्व गट मिळून एकूण 959 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. ‘Maharashtra Child Poet’ Competition
सदर स्पर्धा गत 23 वर्षापूर्वी सुरू केली गेली. या स्पर्धेचे किलबिल गट व बाल गट या दोन्ही गटात बडबड गीत व इतर कवींच्या कविता यांचे सादरीकरण करण्यात येते. तर कुमार, किशोर आणि शिक्षक गट या गटासाठी स्वरचित काव्य असे विषयांचे बंधन नसलेली स्वतःची काव्य रचना स्पर्धकांनी सादर करावयाची होती. यावर्षीच्या स्पर्धेत सर्व गट मिळून एकूण 959 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. ‘Maharashtra Child Poet’ Competition

सदर स्पर्धेचे परीक्षण नाशिकमधील सुप्रसिद्ध कवी श्री. रवींद्र मालुंजकर, श्री नंदकिशोर ठोंबरे, डॉ.चिदांनद फाळके, डॉ.वेदश्री थिगळे, अलका कुलकर्णी, सरिता देवचक्के, भैरवी चित्राव, विदुला अष्टेकर, प्राची भालेराव, आरती डिंगोरे, विलास पंचभाई, जयश्री कुलकर्णी, नेहा देशपांडे, गायत्री वाणी, श्रुती भोर, स्वानंद पारखी, सुरेश लोथे, राखी जोशी, संजय गोराडे इत्यादी परीक्षकांनी यशस्वीपणे ऑनलाईन पद्धतीने परिक्षण केले. या ऑनलाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण व अंतिम सोहळा हा देखील फेसबुक लाईव्ह या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे हे ऑनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यासोबत मंचावर रेडिओ विश्वासचे स्टेशन संचालक श्री हरिभाऊ कुलकर्णी, श्री नंदकिशोर ठोंबरे, ज्ञानवर्धिनी संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुनम सोनवणे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधुरी मरवट, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. विद्या अहिरे, सौ. वेदश्री पाटील, सौ. गौरी भावसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री.शरद गिते, उपमुख्याध्यापक वासंती पाठक आदी उपस्थित होते. ‘Maharashtra Child Poet’ Competition
संस्थेचे सचिव श्री गोपाळ पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी बालकवी स्पर्धेचा 23 वर्षांचा इतिहास उलगडताना पहिल्या वर्षी असलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही स्पर्धा कशी फुलत गेली. सुमारे 20 वर्ष ही स्पर्धा ऑफलाईन होत होती. कोव्हीड आपत्तीच्या काळात इष्टापत्ती अशी संधीत असे परावर्तित करुन सदर स्पर्धा ही ऑनलाईन स्वरूपात सुरू ठेवण्याचा मानस केला. आणि ती स्पर्धा यशस्वीही होत आहे. याचा विशेष आनंद वाटतो. या ऑनलाईन स्पर्धेचे हे 3 रे वर्ष आहे. सहभागी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि ऋण व्यक्त केले. ‘Maharashtra Child Poet’ Competition
या स्पर्धेचा निकाल गटनिहाय खालील प्रमाणे
अन्यरचित काव्यवाचन बालवाडी ते २ री किलबिल गट
प्रथम क्रमांक- उर्वी किरण बावधनकर ( रत्नागिरी ) द्वितीय क्रमांक- नारायणी प्रमोद रेलेकर (कोल्हापूर) तृतीय क्रमांक – अनन्या विशाल मोरे( अहमदनगर) उत्तेजनार्थ-1) गिरिजा स्वप्नील पुरानिक( पुणे), 2) प्रगती शिवाजी घोडके( तुळजापूर), 3) रेवा सारंग वैद्य( पुणे), 4) मुद्रा मंगेश दामले (ठाणे), 5) जान्हवी निलेश सरोदे (नाशिक) ‘Maharashtra Child Poet’ Competition
बालगट- ३ री ते ५ वी
प्रथम क्रमांक – ओम चंद्रशेखर कळके ( पुणे), द्वितीय क्रमांक- प्रतीक्षा नितेश तायडे (नाशिक), तृतीय क्रमांक- आराध्या संतोष मलिक( अहमदनगर), उत्तेजनार्थ-1) गौरी नितिन राठोड (बुलढाणा) 2) वरदा केयुर देवधर( ठाणे) 3) अर्पित सागर मोरे ( नाशिक) 4) अन्वित सचिन जाधव निफाड, (नाशिक ) ‘Maharashtra Child Poet’ Competition
किशोरगट – ६ वी ते ८ वी
प्रथम क्रमांक- विश्वजा शक्ती महाजन (नाशिक ), द्वितीय क्रमांक-ऋतुजा दीपक डोंगरे (नाशिक), तृतीय क्रमांक- शरयू संतोष माने(मुंबई), उत्तेजनार्थ – 1) श्रुती गोविंद कुंभार ( जालना), 2) प्रांजल अमोल सोनवणे (धुळे) ‘Maharashtra Child Poet’ Competition
कुमारगट- ९ वी ते १२ वी
प्रथम क्रमांक – अबोली अजय अडीकणे (अमरावती), द्वितीय क्रमांक – सौंदर्या काळे ( मुंबई), तृतीय क्रमांक – सांची रणशूर (नाशिक),उत्तेजनार्थ- 1) ऋतुजा राजन गावडे ( सिंधुदुर्ग), 2) सानंता तुळजापूरकर (पुणे) ‘Maharashtra Child Poet’ Competition
शिक्षक कवी गट
प्रथम क्रमांक- अजय हरिभाऊ अडीकने (अमरावती), द्वितीय क्रमांक-अर्चना नारायण वासेकर (यवतमाळ), तृतीय क्रमांक – पांडुरंग श्रीरंगराव मुंजाळ (हिंगोली), उत्तेजनार्थ- 1) अलका प्रशांत चंद्रात्रे (नाशिक), 2) पंकजकुमार रामदास गवळी (नाशिक) ‘Maharashtra Child Poet’ Competition
यशस्वी स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना स्व आनंद जोर्वेकर आणि स्व. त्र्यंबक बापूजी ठोंमरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारा महाराष्ट्राचा बालकवी हा पुरस्कार प्रमुख अतिथींच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. किलबिल गटाच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व मा. डॉ. दिपाली चेतन पाटील, बाल गटाच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व मा.श्री. जयंतजी ठोंबरे, कुमार गटाच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व मा. श्री. अनिकेत कुलकर्णी, किशोर गटाच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व मा. श्री.अनिकेत कुलकर्णी शिक्षक गटाच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व डॉ. मुग्धा सापटणेकर यांनी प्रायोजित केले होते. ‘Maharashtra Child Poet’ Competition
सदर स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून कम्युनिटी मिडीया असलेले रेडिओ विश्वास हे होते त्यांचे तर्फे कु.रुचिता ठाकूर व स्टेशन डायरेक्टर श्री हरिभाऊ कुलकर्णी हे उपस्थित होते. सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष अँड श्री. ल.जि . उगावकर, सचिव श्री. गोपाळ पाटील, सहसचिव ॲड.सौ. अंजली पाटील, संचालक श्री. वसंतराव कुलकर्णी, श्री. अनिल भंडारी, श्री. अजय ब्रम्हेचा, श्रीमती छायाताई निखाडे डॉ. सौ. मुग्धा सापटणेकर आदीं संचालकांनी अभिनंदन केले. आणि सर्व प्रायोजकांचे व मिडीया पार्टनर रेडिओ विश्वासचे आभार मानले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संपर्क समिती, परिक्षण समिती व टेक्निकल समिती यात कार्यरत शिक्षकांनी गेली 3 महिने यशस्वी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. कल्पना चव्हाण व सौ. पूजा केदार यांनी केले. सदर स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी सदर स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. ‘Maharashtra Child Poet’ Competition
