• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत 1166 जणांचा समावेश

by Mayuresh Patnakar
May 5, 2023
in Politics
109 1
0
Maharashtra BJP Team

Maharashtra BJP Team

214
SHARES
611
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेच्या 200 + जागा जिंकणार

Guhagar News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी 9 महिन्यांनी प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवली. Maharashtra BJP Team त्यांनी जाहीर केलेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. 3 मे) पत्रकार परिषदेत नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

Maharashtra BJP Team – उपाध्यक्ष

उपाध्यक्षपदी माधव भांडारी,  चैनसुख संचेती,  सुरेश हळवणकर, संजय भेगडे, अमर साबळे, स्मिता वाघ,  जयप्रकाश ठाकूर, संजय भेंडे, गजानन घुगे, राजेश पांडे, विक्रम पावसकर, अतुल काळसेकर, अजित  गोपछडे, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत या 16 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. Maharashtra BJP Team

Crowd at BJP's resolution meeting

Maharashtra BJP Team – सरचिटणीस

सरचिटणीसपदी अ‍ॅड. माधवी नाईक, विक्रांत पाटील,  मुरलीधर मोहोळ,  रणधीर सावरकर, संजय केनेकर,  विजय चौधरी या 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra BJP Team – चिटणीस

चिटणीस पदी भरत पाटील, जयंत डेहनकर, अ‍ॅड. वर्षा डहाळे, सुरेखा खेतले, अरुण मुंडे, महेश जाधव, राणी द्विवेदी, विद्या देवाळकर, अजय भोळे, देविदास राठोड, शालीनीताई बुधे, सरीता गाकरे, योगिता पाटील, सुरेश बनकर, किरण पाटील आणि नवनाथ पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Maharashtra BJP Team

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Maharashtra BJP Team – विभागीय संघटनमंत्री

उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोषाध्यक्षपदी आमदार मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra BJP Team
Maharashtra BJP Team

कार्यकारिणीमध्ये 264  विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा  मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार यांचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. Maharashtra BJP Team

पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की राज्यातील १ कोटी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ‘सरल अ‍ॅप’ (to download SARAL App Click Here) द्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत. लोकसभेच्या 48 आणि महाराष्ट्र विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्याचे नियोजन प्रदेश भाजप करत असल्याचे त्यांनी सांगितले. Maharashtra BJP Team

Tags: BJPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra BJP TeamMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याप्रदेशभाजपभाजपामराठी बातम्यामहाराष्ट्रलोकल न्युज
Share86SendTweet54
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.