एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
गुहागर, ता. 17 : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari
या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. तसेच, या कार्यक्रमासाठी अनेक श्री सदस्यांनी उपस्थिती लावली. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari
यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं, असं अमित शाहा यांनी व्यक्त केले. अमित शाह म्हणाले, कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांशाविना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला एवढा जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari

यावेळी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपली भूमिका मांडताना श्वास चालू असेपर्यंच हे काम असंच चालू ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. भारताचं गृहखातं आणि सहकारखातं सांभाळताना एवढं काम असूनही ते आपल्या सर्वांसाठी इथे हजर राहिले आहेत. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. हा पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यावेळी म्हणाले. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आप्पासाहेबांचा गौरव केला आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी कशी मदत केली याचीही आठवण उपस्थितांना सांगितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या कुटुंबांचं मोठं योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आता सचिनदादा त्यांचं कार्य पुढे नेत आहेत. या लाखो कुटुंबामध्ये माझंही एक कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उभा आहे. आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. मी हे कदापि विसरू शकणार नाही. असे लाखो कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आप्पासाहेबांनी दिशा देण्याचं काम केलं म्हणून हा महासागर येथे उपस्थित आहे, अशी कृतज्ञ भावनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेनं श्री परिवाराकडून केल्या जाणाऱ्या समाजकार्यांचीही माहिती दिली. आप्पासाहेबांचं कार्य अफाट आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य, व्यसनमुक्तीच्या कार्यामुळे लाखो परिवार लाभान्वित झाले आहेत. वृक्षारोपणाचं व्यापक कार्य पार पडलं. २५ लाखांपेक्षा जास्त वृक्ष श्री परिवारानं लावले आहेत. पाच जंगलांचं व्यवस्थापन हा परिवार आज करतो आहे. १६ हजार साधक सातत्याने जलव्यवस्थापनाचं काम करत आहेत. ६४२ टन गाळ श्री परिवारानं काढून विहिरी, नद्या, ओढे, नाले स्वच्छ करण्याचं काम केलं. १३ जिल्ह्यांमध्ये जलपुनर्भरणाचं काम परिवाराच्या माध्यमातून झालंय. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कतार अशा वेगवेगळ्या देशांत रक्तदान शिबिरं घेण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ‘Maharashtra Bhushan’ Award to Appasaheb Dharmadhikari
