शिवगंधार, ग्रंथालीतर्फे ६ डिसेंबरला मुंबईत होणार प्रकाशन
रत्नागिरी ता. 22 : शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे रत्नागिरीचे दिवंगत नाटककार, दिग्दर्शक अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ (Lord Gautama Buddha) या नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन (Publication of the second edition) लवकरच मुंबईत होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी (Mahaparinirvana day) म्हणजे दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवर साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. राजेंद्र गवई आणि सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती शिवगंधारच्या योजना शिवानंद यांनी दिली.
हा कार्यक्रम वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे होणार आहे. या निमित्ताने ‘भगवान गौतम बुद्ध – स्वरवंदना’ ही गायन मैफिल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना, संहिता, निरूपण लेखन आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. त्यांच्यासोबत कुमारी अनन्या गोखले हिचे गायनही होणार आहे. डॉ. मृण्मयी भजक निवेदन करणार आहेत.
Lord Gautama Buddha पहिला प्रयोग 40 वर्षांपूर्वी
४० वर्षांपूर्वी, योजना प्रतिष्ठान निर्मित या नाटकाचा पहिला प्रयोग नागपूर येथे झाला होता. योजना प्रतिष्ठाननिर्मित भगवान गौतम बुद्ध (Lord Gautama Buddha) या नाटकात प्रसिद्ध गायिका योजना शिवानंद (Singer & Artist Yojana Shivanand) यांनी नायिका यशोधरेची भूमिका साकारली होती. डॉ. नितीश भारद्वाज (MP Dr. Nitish Bhardwaj) यांनी या नाटकात नायक सिद्धार्थाची भूमिका केली होती. पुढे दूरदर्शनवरील महाभारत (Mahabharat) या अफाट गाजलेल्या मालिकेतून त्यांनी भगवान कृष्णाची (Lord Shrikrishna) भूमिका केली आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जीवन तत्त्वज्ञानावरील या नाट्यकृतीला रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. भगवान गौतम बुद्ध या नाटकाच्या ५० व्या प्रयोगाला (१९८३) योजना प्रकाशनतर्फे या नाटकाचे पुस्तक शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे प्रकाशित झाले होते. अनोख्या विषयावरील हे वेगळे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ((Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ (‘Buddha and His Dhamma’) या ग्रंथावर आधारित आहे. या नाटकाच्या पुस्तकाला प्रतिभावान लेखक प्रल्हाद जाधव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी (Mahaparinirvana day) भगवान गौतम बुद्ध (Lord Gautama Buddha) या नाटकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत (Publication of the second edition)आहे. याचा आनंद आहे, असे योजना शिवानंद यांनी सांगितले.
रत्नागिरीतील त्रयीला ही नाट्यकृती अर्पण
योजना शिवानंद यांनी रत्नागिरीतील तीन कलाकारांना हे पुस्तक अर्पण केले आहे. ४० वर्षापूर्वी अशोकराज भाट्ये, अविनाश फणसेकर आणि अरुणोदय भाटकर हे तिघे मित्र असलेले कलाकार त्यावेळी एकत्र आले आणि योजना प्रतिष्ठानच्या टीमसोबत त्यांनी ही नाट्यकृती घडवली. दुर्दैवाने आज तिघेही हयात नाहीत. त्यातील अशोकराज भाट्ये हे कवी, लेखक, कीर्तनकार, गझलकार, कथाकथनकार असे हरहुन्नरी कलावंत होते. रत्नागिरीतील खेड्यातून आलेले म्हणजे मुक्काम उमरे, हरचेरी येथून. त्यांनी कलाकामासाठी मुंबई गाठली होती. अविनाश फणसेकर हे जसे लेखक होते, तसेच ते उत्तम कवी, नट, दिग्दर्शक, रंगकर्मी होते. त्यांच्या अप्रतिम संवादानी हे नाटक फुलले आहे.तिसरे अरुणोदय भाटकर हे देखील मूळ रत्नागिरीचे. अत्यंत बुद्धिमान असलेले भाटकर हे विविध विषयातील एक जाणकार संशोधक, अभ्यासक होते. विशेषतः गझल हा त्यांचा आवडता विषय होता आणि त्यासाठी त्यांनी खूप कार्य केले आहे. ते एसआयडब्ल्यूएस ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते. (Lord Gautama Buddha)