गुहागर, ता. 03 : कै. गजानन कळझुणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्तिक कळझुणकर आणि परिवाराने गुहागर येथील प्राथमिक विद्यालयाला साहित्य भेट दिले. शैक्षणिक संस्थेला केलेल्या मदतीबद्दल या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक समीर गुरव यांनी कळझुणकर परिवाराचे आभार मानले आहेत. Literature gift to school
गुहागर तालुक्यातील आरेगावमधील कै.गजानन (गजाभाऊ) शंकर कळझुणकर हे समाजातील गरजुंना मदत करत असतं. त्यांच्या पश्र्चातही कळझुणकर कुटुंबाने हे काम सुरु ठेवले आहे. कै. गजानन तथा गजाभाऊ कळझुणकर यांचा स्मृतीदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने शैक्षणिक संस्थेला आर्थिक मदत करण्याचा निर्णय कळझुणकर कुटुंबाने घेतला. Literature gift to school

गुहागर शहरातील श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाला (Annapurna Sridhar Vaidya Primary School) उपयोग होईल असे साहित्य भेट म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसविण्यासाठी 3 फॅन, वर्ग खोल्यामध्ये पुरेसा प्रकाश असावा म्हणून ट्युबलाईट आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी संतरंज्या असे साहित्य श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक समीर गुरव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. प्राथमिक विद्यालयाला आवश्यक असणाऱ्या भौतिक गरजा पूर्ण केल्याबद्दल गुरवसर यांनी कळझुणकर परिवाराचे आभार मानले आहेत. Literature gift to school
यावेळी गुहागर शहर युवा सेवा अधिकारी राकेश साखरकर, गुहागर शहर भाजपचे अध्यक्ष संगम मोरे, आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीचे उपसरपंच साईनाथ कळझुणकर, कार्तिक कळझुणकर, आणि आकाश भोसले उपस्थित होते. Literature gift to school