• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या विषयावर व्याख्यान

by Ganesh Dhanawade
February 17, 2026
in Guhagar
72 1
0
Lecture on Life Insurance
142
SHARES
405
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये गेस्ट लेक्चरचे आयोजन

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये विद्यार्थ्यांसाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एलआयसी या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री. संतोष वरंडे ( विमा सल्लागार, गॅलेक्सी क्लब मेंबर रत्नागिरी, लायन्स क्लब गुहागर सिटी प्रेसिडेंट) हे उपस्थित होते. Lecture on Life Insurance

सर्वप्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीचे हॉटेल मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख श्री.वृणाल बेर्डे सर यांनी वरंडे सरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. यानंतर श्री. वरंडे सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विमा या विषयाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की विमा म्हणजे आर्थिक संरक्षण (Financial Protection) होय. आयुष्यात कधीही अपघात, आजारपण किंवा इतर अनपेक्षित घटना घडू शकतात. अशा वेळी विमा आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देतो. यावेळी सरांनी LIC चा इतिहास, कार्यपद्धती व विश्वासार्हता याविषयी माहिती दिली. LIC ही भारत सरकारची कंपनी असून अनेक वर्षांपासून लोकांचा विश्वास संपादन करत आहे. LIC च्या  जीवन विमा, बचत योजना, निवृत्ती योजना इत्यादी पॉलिसी बद्दल माहिती सांगून त्यांनी बचतीचे व विम्याचे महत्त्व स्पष्ट केले. “आजपासूनच बचत करण्याची सवय लावा” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. लहान रकमेपासून सुरुवात करून भविष्यात मोठा निधी तयार करता येतो, असे त्यांनी सांगितले. Lecture on Life Insurance

Lecture on Life Insurance

इन्शुरन्स एजन्सी हा एक चांगला व्यवसाय पर्याय आहे, असे त्यांनी नमूद केले. विमा सखी बनून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीसुद्धा आपले करिअर LIC सोबत सुरू करू शकतात.या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी चांगले संवाद कौशल्य, मार्केटिंगचे ज्ञान, आत्मविश्वास व लोकांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. मेहनत व सातत्य ठेवल्यास या क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा उपयोग, ग्राहकांशी संपर्क ठेवण्याच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या काळात डिजिटल माध्यमांचा योग्य वापर केल्यास व्यवसाय वाढवणे सोपे जाते. तसेच  बँकिंग व विमा क्षेत्रातील संधी, आणि आवश्यक कौशल्ये याबद्दल माहिती दिली. केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून Practical अनुभव व आत्मविश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. Lecture on Life Insurance

 हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरले. सदर व्याख्यानासाठी रिगल कॉलेजचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा.श्री संजयराव शिर्के ,संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ.मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Lecture on Life Insurance

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLecture on Life InsuranceMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.