“व्यवसाय व्यवस्थापन व संधी”; नेचर डिलाईट डेअरी प्रा.लि. यांचा संयुक्त उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : चिपळूण तालुक्यातील खरावते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी व डेअरी प्रोडक्ट्स प्रा.लि.इंदापूर जि.पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृषि व्यवसाय व्यवस्थापन, त्यामधील संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी नेचर डिलाईट डेअरी चे एच आर जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत कदम हे व्याख्याते म्हणून लाभले. Lecture at Sharadchandraji Pawar Agricultural College

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतुन महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी यांचा सामंजस्य करार झाला होता. याच कराराच्या धर्तीवर महाविद्यालयामधील कृषि, उद्यानविदया, अन्नतंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना कृषि पुरक व्यवसायांमध्ये रुची निर्माण व्हावी. भविष्यात या विद्यार्थ्यांना दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये असणा-या व्यवसायाच्या संधी या विषयी भरीव मार्गदर्शन मिळेल या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Lecture at Sharadchandraji Pawar Agricultural College

डॉ. कदम यांनी आपल्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. व्यवसाय करत असताना आवश्यक असणारी माहीती, व्यवसायमधील व्यवस्थापन व त्यांचे मूल्ये, आर्थिक शिस्त, संयम, संशोधन या विषयांवर त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भरीव मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयामधील कौशल्य युक्त विद्यार्थ्यांना नेचर डिलाईट डेअरी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट देण्याचे आश्वासन दिले. आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी डॉ. कदम यांचा सन्मान केला व दोन्ही संस्थांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये विद्यार्थ्यी प्रशिक्षण, उद्योजक निर्मिती तसेच कोकणामध्ये विविध कृषि पुरक प्रकल्प स्थापनेसाठी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हरिश्चंद्र भागडे यांनी केले. Lecture at Sharadchandraji Pawar Agricultural College
