सीए चैतन्य वैद्य, रत्नागिरीतील सीए इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान
रत्नागिरी, ता. 21 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉईस व जीएसटी आर ९ आणि ९ सी यावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. थिबा पॅलेस रोड येथील मथुरा हॉटेलच्या सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमात सीए चैतन्य वैद्य यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. Lecture at CA Institute, Ratnagiri
जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार विशिष्ट व्यापाऱ्यांना वार्षिक रिटर्न फॉर्म नं. ९ व ९ सी या स्वरूपात सादर करावे लागतात. या विवरणपत्रांची माहिती, त्यासोबत द्यावयाची आकडेमोड, इनपुट टॅक्स क्रेडिट संदर्भातील तरतुदी यावर सीए वैद्य यांनी सखोल विवेचन केले तसेच डिजीटलायझेशन व ई- गव्हर्नन्सच्या दिशेने जीएसटी ई- इन्व्हॉईस हे सरकारचे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर उहापोह केला. ई- इन्व्हॉईसच्या संकल्पनेतून करचुकवेगिरी व बोगस टॅक्स क्रेडिट यासारख्या गोष्टींनाही आळा बसेल, असे सीए चैतन्य वैद्य यांनी स्पष्ट केले. Lecture at CA Institute, Ratnagiri
या वेळी सीए इन्स्टिट्यूचे शाखाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर यांनी सीए चैतन्य वैद्य यांचा सत्कार केला. याप्रसंगी विकासा चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये, खजिनदार सीए केदार करंबेळकर, सचिव सीए अक्षय जोशी, कमिटी सदस्य शैलेश हळबे प्रमुख उपस्थित होते. तसेच सीएंच्या कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेवटी विचारलेल्या शंकांचे समाधान सीए वैद्य यांनी केले. Lecture at CA Institute, Ratnagiri