गुहागर तालुका भंडारी समाज आयोजित; 16 संघ सहभागी
गुहागर, ता. 04 : तालुका भंडारी समाज आयोजित जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२२ भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला गुहागर आरेपूल येथील क्रिकेट मैदानावर शानदार सुरूवात झाली, असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्य नेत्रा ठाकूर (Zilla Parishad member Netra Thakur) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. Launch of Jay Bhandari Cricket Tournament


या स्पर्धा चार दिवस खेळविल्या जाणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. या क्रिकेट प्रीमियर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ५५ हजार ५५५ रुपये व चषक, तसेच द्वितीय क्रमांकास ३३ हजार ३३३ रुपये व चषक व अन्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Launch of Jay Bhandari Cricket Tournament


यावेळी गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal), गुहागर नगरपंचायतीच्या शिक्षण सभापती सुजाता बागकर (Education Speaker Sujata Bagkar), अमोल वराडकर, प्रमोद भोसले, बंडू गडदे, मोहन बागकर, आरे गावचे सरपंच श्रीकांत महाजन, निलेश मोरे, रमेश देवकर, प्रमोद पोळेकर, सचिन जाधव, टी. डब्लू. जे. संचालक स्वप्नील नार्वेकर, मुरलीधर बागकर, पद्माकर भोसले, निलेश मोरे, ऋषी तवसाळकर, दीपक शिलधनकर, श्रीधर बागकर, सतीश शेटे, हेमचंद्र आरेकर, दीपक कनगुटकर , प्रदीप सुर्वे आदी उपस्थित होते. Launch of Jay Bhandari Cricket Tournament


या स्पर्धेमध्ये गुहागर तालुका भंडारी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मास्टर अविनाश नरवण (संघ मालक – सचिन जाधव), जी. एस.के. फायटर (संघ मालक – कार्तिक कनझुनकर, हमरेश कनझुनकर), गुहागर फायटर्स (संघ मालक – राकेश साखरकर ), टी.डब्लू. जे.गुहागर (संघ मालक – स्वप्निल नार्वेकर) , डी. एन. लायन्स (संघ मालक – निलेश अनंत मोरे), श्रीराम डेव्हलपर (संघ मालक – दशरथ भोसले, खोत), बाळू इलेव्हन (संघ मालक – धनजय बागकर), भूमी वॉरियर्स ( संघ मालक- संतोष गोयथले), जे. डी. फायटरस (संघ मालक -जयदेव मोरे, दीपक कनगुटकर), कल्पवृक्ष इलेव्हन (संघ मालक – निलेश सुर्वे) आर्य इलेव्हन ( संघ मालक – निलेश मोरे), प्रतीक इलेव्हन (संघ मालक – प्रतीक ठाकूर) एस. डी . इलेव्हन ( संघ मालक – श्रीधर बागकर, दीपक शिलधनकर), स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान (संघ मालक – साहिल आरेकर, मंदार कचरेकर , सिद्धेश आरेकर ) आर. के. डी. वॉरियर्स (संघ मालक – सागर मोरे, अनिकेत भोसले, मयुरेश पावसकर ) समर्थ कृपा इलेव्हन (संघ मालक – ऋषिकेश तवसालकर) आदी संघ सहभागी झाले आहेत. Launch of Jay Bhandari Cricket Tournament