RGPPL मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांचे हस्ते उद्घाटन
गुहागर, ता. 08 : : वेलदूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयुष क्लिनिक हे उपकेंद्र खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी आरोग्य वर्धिनी बनेल. सर्वांच्या सहकार्यातून हे क्लिनिक महाराष्ट्र राज्यात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे (RGPPL) मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांनी केले. Launch of AYUSH Clinic at Veldur


गुहागर तालुक्यातील वेलदूर आरोग्य उपकेंद्रामध्ये रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी (RGPPL)आणि आरोग्य विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यावेळी रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते फीत कापून क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला. Launch of AYUSH Clinic at Veldur
यावेळी आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीचे जनरल मॅनेजर हरबंस सिंह बावा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, अडिशनल जनरल मॅनेजर डी. सुरेश, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज देशमुख, मुख्य वित्त अधिकारी अजय शर्मा, माजी पंचायत समिती सदस्य स्मिता धामणस्कर, माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, नंदकुमार रोहीलकर, समुदाय आरोग्य अधिकारी कुंभार, आरजीपीपीएल कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज इंजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिशू रंजन सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. Launch of AYUSH Clinic at Veldur
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. पंकज देशमुख यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा सांगतानाच उपकेंद्रात कर्मचारीच नसल्याचे स्पष्ट केले. हे क्लिनिक जनतेला लाभदायी ठरेल असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले की, सर्व उपचार आयुष क्लिनिकच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. आयुष क्लिनिकमुळे जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात होईल. Launch of AYUSH Clinic at Veldur