व्याघ्रांबरी बचत समुह यांच्या गांडूळखत प्रकल्पावर
गुहागर, ता. 30 : कृषी क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाचा व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वापर महिला सक्षमीकरणासाठी करण्याचे आव्हान असगोली येथील व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गटाने लिलया पेलले आहे. त्यामुळे गेल्या 17 वर्षांपूर्वी या बचत समुहाने उभारलेल्या गांडूळखताचा प्रकल्प यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांनी कृषी संजीवनी मोहीम या कार्यक्रमात काढले. Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

पं. स. गुहागर मार्फत कृषी संजीवनी मोहीमेअंतर्गत “महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण” कार्यक्रम नुकताच असगोली येथील व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत समुह यांच्या यशस्वी गांडूळखत प्रकल्पावर साजरा करण्यात आला. यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, नरेगाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नेहा धातकर, तांत्रिक अधिकारी नयना जाधव यांच्यासह व्याघ्रांबरी बचत समूहाच्या व असगोली गावातील इतर बचत समुहातील महिला उपस्थित होत्या. Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रीय शेतीसाठी गांडूळखताचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नरेगा योजनेतून महिला सक्षमीकरण करा, असे धायगुडे यांनी सांगितले. नरेगाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नेहा धातकर व नयना जाधव यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या फळबाग योजना, गांडूळखत व नॅडेप कंपोस्ट खत खड्डा याबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

या कार्यक्रमात व्याघ्रांबरी बचत गटाच्या सचिव रंजना कावणकर यांनी बचत समुहातील 17 वर्षाचा प्रवास विदीत केला. बचत समुहातील सुलभा रामाणे, विजया कोळंबे, अनिता कावणकर, रत्नप्रभा रामाणे, सुप्रिया घाणेकर, रेणुका झगडे, संजना घाणेकर, मनाली कावणकर, रोहिणी जोशी, श्रेया कोळंबे, अनुष्का घाणेकर, सानिका घाणेकर, कल्पना कावणकर, मयुरी कावणकर या महिलांबरोबरच असगोलीतील इतर बचत समुहातील महिला वर्ग उपस्थित होता. Krishi Sanjeevani Mohim at Asgoli कार्यक्रमाच्या शेवटी सौ. संजना घाणेकर यांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, नरेगाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नेहा धातकर, तांत्रिक अधिकारी नयना जाधव बचत समूहातील उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले. Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

