गुहागर, ता. 28 : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या व्यक्ती मतदार म्हणून नावनोंदणी करू शकतात. यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील अशा व्यक्तींनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे मॅडम यांनी केले आहे. Konkan Graduate Voter Registration


कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पात्र पदवीधर मतदारांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तो मतदार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचा पदवीधर आवश्यक आहे. मतदार नोंदणी करताना नमुना नंबर १८ भरणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठी एक पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, पदवी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड किंवा लाईट बिल, नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा पॅनकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी. (नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.) Konkan Graduate Voter Registration


अधिक माहितीसाठी शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २०२३ पहावा. मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx हे बघावे. किंवा प्रत्यक्ष अर्ज भरून (हार्डकॉपी) जवळच्या तहसील कार्यालय/ उपविभागीय कार्यालय येथे जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठविताना सर्व कागदपत्रे ही राजपत्रित अधिकारी/ पब्लिक नोटरी यांच्याकडून प्रमाणित करून पाठवावीत. पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुना १८ तहसील कार्यालय येथील निवडणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार वराळे प्रतिभा मॅडम यांनी केले आहे. Konkan Graduate Voter Registration
:महत्वाचे :
पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करताना व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन नोंदणी अर्ज जमा करायचा आहे, एकगठ्ठा नोंदणी किंवा सरकारी कार्यालयाच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मधून होणार नाही याची नोंद घ्यावी.