मराठी भाषेसाठी धावणार धावपटू; पारंपरिक वेशभूषेत ‘एक धाव मराठीसाठी’
रत्नागिरी, ता. 03 : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उद्या रविवारी सकाळी हजारो धावपट्टू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ३०० १२ राज्यांतून २२०० हून अधिक धावपटू यात सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषा करून आणि नामवंत व्यक्तीमत्वांच्या पेहरावात धावपटू धावणार आहेत. जागतिक पातळीवर मराठी भाषेसाठी अशी प्रथमच मॅरेथॉन होत असून धावपटू उत्साहित झाले आहेत. आज या सर्व धावपटूंना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणातून नंबर व किटचे वितरण करण्यात आले. Konkan Coastal Half Marathon
रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. थिबा पॅलेस रोड येथून उद्या सकाळी ६.३० वाजता २१ किमी, ६.४५ वाजता १० किमी व ७.१० वाजता ५ किमीची स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर होणार असून तेथे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. २१ किमीसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, कोळंबे, फणसोप व भाट्ये, १० किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे, शांतीनगर युटर्न, नाचणे, मारुती मंदिर, माळनाका, जेलनाका, भाट्ये असा मार्ग आहे. ५ किमीसाठी मारुती मंदिर, पॉवर हाऊस नाचणे रोड युटर्न मारुन मारुती मंदिर, माळनाका, जेलनाकामार्गे भाट्ये असा मार्ग आहे. Konkan Coastal Half Marathon

सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित या स्पर्धेसाठी राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि मराठी भाषा विभागाने यासाठी बहुमूल्य सहकार्य केले. स्पर्धेकरिता बँक ऑफ इंडिया, अॅड प्लस, सोर्जेन सॉक्स, एनर्जाल, जोशी फूड्स, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशन यांचेही सहकार्य लाभणार आहे. Konkan Coastal Half Marathon
दरवर्षीप्रमाणे अंकिता पाटकर आणि त्यांची झुंबा टीम या मॅरेथॉन आधी झुंबा सेशन घेणार आहे आयपॉपस्टार फेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉनचे गाणे बनवले आहे. ५, १० आणि २१ किलोमीटरसाठी धावपटू धावणार आहेत. २१ किमी चा एक दिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्र किनारी सांगता, ९ गावांमधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्र किनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात आणि यामुळेच ही कोकणवासीयांची मॅरेथॉन लोकप्रिय होते आहे. Konkan Coastal Half Marathon