वेळणेश्र्वर रिसॉर्ट ठरले बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयरचे मानकरी
गुहागर, ता. 15 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ पुरस्कारासाठी गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वरची निवड केली. तर बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर’ आणि ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ या पुरस्कारांसाठी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) ची निवड केली. पर्यटन महामंडळाच्या आढावा बैठकीत कोकण पर्यटन विकास महामंडळाने अव्वल स्थान पटकावले. (Konkan Best for Tourism)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आढावा सभा शनिवारी मुंबईत झाली. या आढावा सभेमध्ये कोरोना संकटानंतर देश विदेशातील पर्यटकांनी कोकणात फिरण्याला पसंती दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच पर्यन महामंडळाच्या 6 विभागांमध्ये कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले. याच आढावा सभेमध्ये पुरस्कारांची घोषणा झाली. (Konkan Best for Tourism)
Konkan Best for Tourism
MTDC बेस्ट रिसॉर्ट ऑफ दि इयर
पर्यटन महामंडळातर्फे विविध पर्यटन स्थळांचे ठिकाणी रिसॉर्ट, हॉटेल, आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. या रिसॉर्ट पैकी धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टने २०२१-२२ या आर्थिक वर्षात एमटीडीसीला १ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवून दिला. त्यामुळे गणपतीपुळे रिसॉर्टला ‘बेस्ट रिसॉर्ट ऑफ दि इयर’चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या रिसॉटचे व्यवस्थापक वैभव पाटील यांनी पर्यटकांना उत्तम सुविधा दिल्या. व्यवसायात वृद्धी केली. त्याबद्दल वैभव पाटील यांचा सत्कार एमटीडीसी करणार आहे.
MTDC बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये राहिलेल्या पर्यटकांनी रिसॉर्टमधील सेवा, सुविधा आदीबाबत सर्वाधिक चांगली मते व्यक्त केली. त्यामुळे ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ या पुरस्कारासाठी वेळणेश्र्वर रिसॉर्टची निवड करण्यात आली. त्यामुळे या रिसॉर्टचे व्यवस्थापक स्वप्निल पवार यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. वेळणेश्र्वर येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील प्रत्येक खोलीमधुन समुद्रदर्शन घडते. येथील जेवणाची गुणवत्ता चांगली आहे. परिसर चांगला आहे. त्यामुळे निवास केलेल्या पर्यटकांपैकी 54 टक्के पर्यटकांनी या रिसॉर्टला Five Star Rating दिले आहे. 32 टक्के पर्यटकांनी Four Star Rating आणि 10 टक्के लोकांनी Three Star Rating दिले आहे.
(Google Review वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
रायगड जिल्हातील हरिहरेश्वर एमटीडीसी रिसॉर्टलाही बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर चा सन्मान मिळाला आहे. या रिसॉर्टचे व्यवस्थापक सुभाष चव्हाण यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे एमटीडीसीने नव्याने रिसॉर्ट बांधले आहे. पदार्पणातच या रिसॉर्टने चांगली कामगिरी केली. त्याबद्दल या रिसॉर्टचे व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण यांचाही सन्मान एमटीडीसी करणार आहे. निवड झालेल्या सर्वांना काही दिवसांतच प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात येतील अशी माहिती एमटीडीसीचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली. (Konkan Best for Tourism)
गणपतीपुळे सुरु होणार नवीन उपक्रम
या आढावा सभेमध्ये पर्यटन विकासासंदर्भातही चर्चा झाली. त्याबद्दल बोलताना कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी सांगितले की, पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा सुरू केल्या आहेत. ‘वेडिंग– बर्थ डे डेस्टिनेशन’ म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. (Konkan Best for Tourism)