संगीतकार शशांक कोंडविलकर यांची दिवाळीची संगीतमय भेट
गुहागर, ता.26 : दिवाळी म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतिषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी, दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची लयलूट, दिवाळीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने “आली दिवाळी” हे गाणे लाॕच केले आहे. साईनाथ राजाध्यक्ष, विना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने आली दिवाळी या गाण्याची निर्मिती केली आहे. Kondwilkar’s “Aali Diwali” music video released

गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपूत्र शशांक कोंडविलकर यांनी या गाण्याचे गीत लेखन आणि संगीत दिग्दर्शन केले असून युक्ता पाटील आणि सत्यम पाटील यांनी हे गाणे गायले आहे. म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक नीरव म्हात्रे यांचे आहे. तसेच अस्मिता सुर्वे, भरत जाधव, प्राजक्ता ढेरे, प्रणय केणी, दिव्या पाटील, पंकज ठाकूर, रश्मिता तारे, सौरभ गर्गे, वीना राजाध्यक्ष, परिणीती ठाकूर, रुपांश पाटील या इन्स्टा स्टार्स सोबत सात बाल कलाकार आदी कलाकार या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत. राहुल आणि मयूर पाटील यांनी हे गीत छायाबद्ध केले, असून मिक्स मास्टर विशाल भोईर यांचे आहे. Kondwilkar’s “Aali Diwali” music video released
दिवाळीच्या काळात घरोघरी असलेले आनंद आणि उत्साहाचे वातावरण या म्युझिक व्हिडिओ मधून टिपण्यात आले आहे. अतिशय उत्तम शब्द श्रवणीय संगीत हे या गाण्याचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामूळे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे हे गाणे दिवाळीच्या अनेक आठवणींना नक्कीच उजाळा देईल. त्यामूळे दिवाळीचा आनंद यंदा “आली दिवाळी” या म्युझिक व्हिडिओ व्दारे व्दिगुणीत होईल हे नक्कीच! Kondwilkar’s “Aali Diwali” music video released
