• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खो-खो राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

by Guhagar News
December 9, 2025
in Maharashtra
83 1
1
Kho-Kho Selection Test Competition
164
SHARES
468
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीच्या मुलींची जालना संघावर मात

गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या साखळी सामन्यांत रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत जालना संघावर मात केली. Kho-Kho Selection Test Competition

बुऱ्हाणनगर येथील अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून ४ ते ७ डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत. मुलींच्या गटात रत्नागिरी संघाने साजेसा खेळ करीत जालना संघावर १ डाव  ९ गुणांनी (१६-७) विजय मिळवला. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर हा सामना रत्नागिरीने सहज खिशात घातला. यामध्ये मृण्मयी नागवेकर ३ मिनीटे संरक्षण, रिध्दी चव्हाण २.३० मिनिटे संरक्षण, आर्या डोर्लेकरने २.३० मिनिटे संरक्षण, दिव्या सनगले २ मिनिटे संरक्षण खेळ केला. Kho-Kho Selection Test Competition

या स्पर्धेतील अन्य सामन्यांचे निकाळ पुढील प्रमाणे :

बलाढ्य धाराशीवने परभणीवर १ डाव ३ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिलीने ४ मिनिट १० सेकंद संरक्षण केले. सांगलीने बीडवर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. सांगली संघाकडून स्वप्नाली तामखडे आणि श्रेया तामखडे यांनी प्रत्येकी ३ मिनिट संरक्षण केले. सोलापूरने लातूरवर १ डाव ९ गुण राखत विजय मिळवला. सोलापूर कडून समृद्धी सुरवसेने नाबाद तीन मिनिट 20 सेकंद पळतीचा खेळ केला तर कल्याणी लांबकाणेने ४ मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ करून आक्रमणात ४ गडी बाद केले. ठाणे संघाने सिंधुदुर्गवर २४ गुणांनी विजय संपादन केला. ठाणे संघाकडून दीक्षा काटेकर हे ३ मिनिट 20 सेकंद तर प्रणिती जगदाळे यांनी ३ मिनिट संरक्षण केले. अक्षरा भोसलेने आक्रमणामध्ये ७ गडी बाद केले. मुंबई उपनगर संघाने नांदेड वर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. उपनगर संघाकडून दिव्या चव्हाणने ३ मिनिटे तर दिव्या गायकवाड ने ४ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. तर रत्नागिरीने जालना संघावर १ डाव  ९ गुणांनी (१६-७) मोठा विजय मिळवला. पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या (मुलांच्या) गटातील सामन्यात धाराशिवने १ डाव ६ गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली संघाने छत्रपती संभाजी नगरचा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर १ डाव 21 गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा १ डाव 16 गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. तर बलाढ्य ठाणे संघाने हिंगोलीवर १ डाव 18 गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. Kho-Kho Selection Test Competition

Tags: GuhagarGuhagar NewsKho-Kho Selection Test CompetitionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.