पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स, महिला गटात आर्यन क्लब विजयी
रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री लक्ष्मी पल्लिनाथ स्पोर्ट्स क्लब, पाली आयोजित पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स क्लबने तर महिला गटात आर्यन स्पोर्ट्स क्लबने अजिंक्यपद पटकावले. तसेच या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून संगमेश्वरच्या आशिष बालदे आणि महिलांमध्ये रत्नागिरीच्या आर्यन क्लबची वैष्णवी फुटक यांचा गौरव करण्यात आला. Kho-Kho competition concluded in Pali
पाली येथील श्री लक्ष्मी पल्लिनाथ स्पोर्ट्स क्लब आयोजित दि. १४ व १५ डिसेंबर या कालावधीत दिवस-रात्र जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा मराठा मंदिर पाली हायस्कूल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत पुरुष गटात १८ तर महिला गटात ८ संघानी सहभाग घेतला होता. पुरुष गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. लांजा संघाने संगमेश्वर संघावर १ गुणांनी निसटता विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लांजा संघाने अंतिम सामना १३ – १२ असा जिंकला. लांजा संघाकडून हर्ष मानेने १.२० व १.१० मीनिटे संरक्षण तर रोहित रांबाडेने १.१०, १.४० मीनिटे संरक्षण करताना आक्रमणात ४ गाडी बाद केले. संगमेश्वर संघाकडून आशिष बालदेने १.४० मी., नाबाद १.०० मी. संरक्षण केले. ओंकार मुंडेकरने ४ गडी बाद केले. Kho-Kho competition concluded in Pali

महिला गटाच्या अंतिम सामन्यात आर्यन अ संघाने आर्यन ब संघावर अंतिम सामन्यात ९ – २ असा एकतर्फी विजय मिळवला. आर्यन अ संघाकडून ऐश्वर्या सावंतने नाबाद २.५० मी., अपेक्षा सुतारने २ मी. संरक्षण केले. पायल पवारने आक्रमणात ३ गडी बाद केले. ब संघाकडून एकाकी लढत देताना साक्षी लिंगायतने २.०० संरक्षण केले. Kho-Kho competition concluded in Pali
पुरुष विजेत्या संघाला रोख रुपये १३ हजार ३३३, उपविजेत्या संघाला रुपये ९ हजार ९९९ तर महिला गटातील विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रूपये व उपविजेत्या संघाला रुपये ३ हजार ३३३ रूपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना चषक तर पराभूत संघाला सन्मानचिन्ह देण्यात आले. Kho-Kho competition concluded in Pali
दोन दिवस प्रकाश झोतात झालेल्या या स्पर्धेला पाली येथील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सर्वच समान चुरशीचे झाल्यामुळे प्रेक्षकांनी खेळाडूंचे कौतुकही केले. उत्कृष्ट नियोजन, उत्साही आयोजक, सामान्यांचे थेट प्रक्षेपण, खेळाडूंची भोजन व्यवस्था यामुळे स्पर्धा अतिशय दर्जेदार झाली. स्पर्धेदरम्यान पाली येथील अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली. स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉ. मिलिंद वासुदेव, शिवसेना विभाग प्रमुख सचिन सावंत, माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम, शिवसेना उपविभाग प्रमुख गौरव संसारे, माजी उप सभापती उत्तम सावंत, तसेच लक्ष्मी पल्लिनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष षण्मुखानंद पालकर, सचिव गौरंग लिंगायत, खजिनदार प्रतीक सावंत आदी उपस्थित होते. Kho-Kho competition concluded in Pali

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेजस पालकर, संकेत पालकर, संकेत साळवी, ललित सावंत, ओंकार पांचाळ, कल्पेश राऊत, ओंकार सावंत, अभिजीत बारे, वैभव मोरे, सौरभ गराटे, पार्थ चौगुले, तुषार लिंगायत, मिथिल दळवी, राणाभुवन पालकर, निखिलेश सावंतदेसाई, यश लिंगायत, पारस पालकर, निषाद लिंगायत, आदित्य स्वामी, वेदांत राऊत, प्रथम पोवार, कार्तिक पोवार, मिहिर सावंत, राज सावंत, सार्थक सावंतदेसाई, पार्थ पालकर यांनी कठोर परिश्रम घेतले. Kho-Kho competition concluded in Pali
स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन राज्यस्तरीय स्पर्धेच्या दर्जाचे होते. उत्तम प्रकाश व्यवस्था, स्कोअर बोर्ड आणि दर्जेदार मैदान यामुळे खेळाडूंना स्पर्धेचा आनंद लुटता आला. स्वतः सर्व आयोजक व्यासपीठावर न बसता मैदानात उतरून खेळाडूंना कोणतीही उणीव भासणार नाही, याची काळजी घेत होते. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. – ऐश्वर्या सावंत, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त. Kho-Kho competition concluded in Pali
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर खेळाडूंसाठी घेतलेली स्पर्धा, असेच या स्पर्धेबाबत म्हणायला हरकत नाही. खूप थंडी असूनही प्रेक्षकांचा उपस्थिती कौतुकास्पद होती. पराभूत संघाला सन्मान चिन्ह आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीरला पदक देऊन गौरविण्याच्या उपक्रमामुळे खेळाडूना प्रोत्साहन मिळाले. रात्री सामने संपल्यानंतर केलेली भोजन व्यवस्था अतिशय उत्तम अशी होती.- अपेक्षा सुतार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त. Kho-Kho competition concluded in Pali
