गुहागर, ता. 3 : रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची नूकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून मुकेश अजगोलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून परेश बावकर, सचिव आशीर्वाद पावसकर, सहसचिव सचिन दाभोळकर तर खजिनदार म्हणून संजोग अडूरकर यांची निवड करण्यात आली आहे. Kharvi Cricket Association Established

कोकणातील गुहागर तालुक्यास समुद्रकिनारा सर्वात जास्त आहे. या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात अनेक नवोदित क्रिकेटपटू उदयास येत आहेत. या क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळावे. आणि त्यांना भविष्यात चांगली संधी मिळावी. यासाठी या असोसिएशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी कारूळ गावचे सत्यजित असगोलकर, प्रताप अडूरकर, अनिल जागकर, विकास दाभोळकर, व जवळपासच्या इतर गावातून प्रतिनिधी उपस्थित होते. Kharvi Cricket Association Established

