• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे व भाटकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष

by Mayuresh Patnakar
April 23, 2024
in Politics
167 2
0
Khare n Bhatkar District Vice President of BJP

Khare n Bhatkar District Vice President of BJP

328
SHARES
937
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाध्यक्ष केदार साठेंनी दिले नियुक्ती पत्र

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते Kiran Khare and Abhay Bhatkar appointed as  District Vice President of BJP नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 22) गुहागर तालुक्यातील देवघर येथे गुहागर विधानसभा क्षेत्रातील वॉरियर्स आणि जिल्हा कार्यकारीणीची बैठक होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी खरे व भाटकर यांच्या नावांची घोषणा केली. Khare n Bhatkar District Vice President of BJP

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुथ समित्यांची सक्रीयता वाढविण्यासाठी देवघर येथे भाजपने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला गुहागर विधानसभा क्षेत्रातील एका पेक्षा अधिक बुथची जबाबदारी असलेले सर्व वॉरियर्स, तिन्ही तालुक्यांचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारीणीतील पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत किरण खरे व अभय भाटकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याची घोषणा करण्यात आली. Khare n Bhatkar District Vice President of BJP

Khare n Bhatkar District Vice President of BJP
अभय भाटकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष केदार साठे

Khare n Bhatkar District Vice President of BJP

गुहागर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे हे मागील कार्यकारीणीतही जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. तर हेदवीमधील भाजप कार्यकर्ते अभय भाटकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे नवी जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली त्यावेळी या दोघांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने जिल्हा कार्यकारीणीमधील गुहागर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्याचा फायदा निश्चितच पक्षाच्या संघटनवाढीसाठी होणार आहे. Khare n Bhatkar District Vice President of BJP

देवघरमध्ये झालेल्या बैठकीला वॉरिअर्स विभागाचे सह संयोजक संजयजी, भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रशांत शिरगांवकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ. निलम गोंधळी, जिल्हाध्यक्ष केदार साठे, खेडचे तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, चिपळूणचे तालुकाध्यक्ष अजित थरवण, गुहागरचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्यासह जिल्हा कार्यकारीणीती पदाधिकारी व गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व वॉरियर्स उपस्थित होते. Khare n Bhatkar District Vice President of BJP

Tags: BJPGuhagarGuhagar NewsKhare n Bhatkar District Vice President of BJPLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.