उत्तंग झेप : 3 हजार ग्राहक, 5 कोटीच्या ठेवी, 4 कोटीचे कर्ज व 1 कोटीची गुंतवणूक
गुहागर, ता. 04 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली निवडणुक बिनविरोध झाली. पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वि. वाघमारे यांनी दि. २ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहीर केला. अल्पावधीत यशस्वी झालेल्या या पतसंस्थेने 3 हजार ग्राहक, 5 कोटीच्या ठेवी, 4 कोटीचे कर्ज व 1 कोटीची गुंतवणूक अशी झेप घेतली आहे. Kharavi Samaj Patsanstha
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/01/patankar.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/01/patankar.jpg)
खारवी समाज पतसंस्थेचा निकाल पुढील प्रमाणे :
अ) रत्नागिरी तालुका (सर्वसाधारण) : १) श्री. सुधीर महादेव वासावे, २) श्री. कमलाकर धोंडू हेदवकर ३) श्री. वासुदेव भिकाजी वाघे ४) श्री. दिनेश बाबाजी डोर्लेकर
ब)राजापूर तालुका (सर्वसाधारण) : १) श्री. मदन गुणाजी डोर्लेकर
क) गुहागर तालुका (सर्वसाधारण) : १) श्री. दिनेश काशिनाथ जाक्कर, २) श्री. रमेश केशव जाक्कर, ३) श्री. संदीप विश्राम वणकर ४) श्री. कृष्णा पांडुरंग तांडेल
ड) दापोली तालुका(सर्वसाधारण) : १) श्री. वैभव लक्ष्मण पालशेतकर
इ) विशेष मागास प्रवर्ग : १) श्री. संतोष जनार्दन पावरी
फ) महिला राखीव : १) सौ. ध्रुवी किशोर लाकडे, २) सौ. दीप्ती देवेंद्र कोलथरकर
खारवी पतसंस्थेची (Kharavi Samaj Patsanstha) वाटचाल
सन २०१९- २०, २०२०-२०२१ ही दोन आर्थिक वर्षे व सन २०२१-२२ मधे आज अखेर कोव्हीड-१९या महामारीने ने ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत “खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने” आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे. Kharavi Samaj Patsanstha
या पतसंस्थेने ३ वर्षात ३९४४ ग्राहक सभासद, ५ कोटी ४५ लाखाच्या ठेवी, ४ कोटी २० लाखांची कर्जे, १ कोटी ८१ लाखाची गुंतवणूक, ६ कोटी ८१ लाखांचे खेळते भांडवल असा प्रवास केला. लेखा परिक्षणात सलग ३ वर्षे अ वर्ग प्राप्त केला आहे. आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था. सभासदांना पहिल्या वर्षांपासुनच शेअर्स रकमेवर लाभांश देणारी पतसंस्था. ३ वर्षात सोने तारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव न करण्यास पात्र ठरलेली पतसंस्था. संगणिकृत पतसंस्था. जिल्हा स्तरावरचे कार्यक्षेत्र असतानाही शाखविस्ताराचे निकष पूर्ण करून अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करणारी पतसंस्था. अशी झेप या पतसंस्थेने घेतली आहे. Kharavi Samaj Patsanstha
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्ह्याची पहिलीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्व स्तरातून या पतसंस्थेचे अभिनंदन होत आहे. Kharavi Samaj Patsanstha